2023-qualifier-2-mumbai-indians-won-the-toss-and-decided-to-bowl-first-against-gujarat-titans-see-playing-11 | नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने, गुजरातची प्रथम फलंदाजी, पाहा प्लेईंग 11

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MI vs GT, IPL 2023 Qualifier 2 Live: मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. क्वालिफायर 2 सामन्यातील विजेता संघ फायनला पोहचणार आहे. 28 मे रोजी चेन्नईसोबत क्विलाफायर 2 चा विजेता संघ भिडणार आहे. 

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 –  इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

गुजरात टायटन्स प्लेईंग 11 : वृद्धीमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

GT vs MI Head to Head : मुंबई विरुद्ध गुजरात हेड-टू-हेड
 
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघ तीन वेळा आमने-सामने आले आहे. या आकडेवारीनुसार, मुंबई इंडियन्सचं पारड जड आहे. तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्याने अहमदाबादमध्ये या हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी आयपीएल विजेत्या मुंबईचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2022 (IPL 2022) आणि आणि आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये प्रत्येकी एका लीग सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला.

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?
चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये (IPL 2023 Qualifier 1) गुजरात टायटन्सचा (GT) पराभव करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या मोसमात याआधी मुंबई आणि गुजरात हे दोन संघ आमने-सामने आले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. या मोसमाच्या सुरुवातीला गुजरात टायटन्सने (GT) मुंबई इंडियन्सला (MI) घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यात मुंबई इंडियन्सनं पराभवाचा वचपा काढत विजय मिळवला. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमधील मुंबई इंडियन्सचा दमदार विक्रम पाहता आकडेवारीनुसार, मुंबईचं पारड जड आहे. 

[ad_2]

Related posts