Indian Railways Mistake Became Indian Kisan Owner Of Train Swarna Shatabdi; रेल्वेच्या चुकीने शेतकरी झाला ट्रेनचा मालक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : एका सामान्य शेतकरी थेट रेल्वेचा मालक झाल्याची घटना देशात घडली आहे. रेल्वेच्या एका चुकीमुळे हा शेतकरी रेल्वेचा मालक झाला. स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. रेल्वेऐवजी या ट्रेनचा मालक एक शेतकरी आहे. ही ट्रेन अमृतसह ते नवी दिल्ली दरम्यान धावते. १२०३० असा या ट्रेनचा क्रमांक असून या ट्रेनची मालकी रेल्वेकडे असण्याऐवजी चक्क एका शेतकऱ्याच्या नावे आहे. असं कसं झालं? हे वाचून तुम्हीही डोक्याला हात माराला.

काय आहे संपूर्ण प्रकरण…

खरंतर, या प्रकरणाला २००७ पासून सुरुवात झाली. लुधियाना चंदीगड रेल्वे लाईनच्या बांधकामावेळी एका शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती. पण यावेळी त्याला रेल्वेकडून योग्य तो मोबदला मिळाला नाही. त्यानंतर कटना गावातला शेतकरी संपूर्ण सिंग याने यासाठी न्यायालयात दाद मागितली आणि संपूर्ण प्रकरणाची नोंद केली. यानंतर न्यायालयाने निकाल देत शेकऱ्याला १.०५ कोटी रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. मात्र, रेल्वेने नुकसान भरपाईची रक्कमही शेतकऱ्याला दिली नाही.

Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस

नुकसान भरभाई न देता चक्क ट्रेनच केली शेतकऱ्याच्या नावावर…

न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या आदेशाचं रेल्वेने पालन न केल्यामुळे या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी लुधियाना स्थानकावरील ट्रेन क्रमांक १२०३० सह स्टेशन मास्टरचं कार्यालयही जप्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कटाना इथला रहिवासी संपूर्ण सिंग हा रेल्वेच्या मालमत्तेचा मालक बनला. यानंतर विभाग अभियंता प्रदीप कुमार यांनी न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून ट्रेन सोडवून घेतली. मात्र, हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू असून त्यावर सुनावणी सुरू आहे.

WHO Warning : काय आहे ‘डिजीज X’? थेट WHO ने दिला अलर्ट; शास्त्रज्ञांच्या चिंतेने लोकांचं टेन्शन वाढलं

२०१२ मध्ये अपील दाखल करण्यात आली…

मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या पहिल्या आदेशामध्ये कोर्टाने नुकसान भरपाई म्हणून २५ लाख रुपये प्रति एकर वरून ५० लाख रुपये केली होती. त्यानंतर ही भरपाई १.४७ कोटी रूपयांवर गेली. ही याचिका २०१२ मध्ये दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने २०१५ मध्ये पुन्हा रेल्वेला नुकसान भरपाईचे आदेश दिले. पण यानंतरही रेल्वेने याकडे दुर्लक्ष केलं.

लग्नात पाहिलं अन् एकमेकांवर भाळले, लॉजवर भेटताच प्रेमभंग; पुण्याच्या तरुणीसोबत शेगावात घडलं भयंकर

[ad_2]

Related posts