Google Updated Android Auto Now You Can Do This Work Along With Zoom Calls From Car Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Android Auto : गुगल नेहमीच नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक फीचर्स अपडेट करत असतं. यामुळे यूजर्स अगदी सहजपणे या फीचर्सचा वापर करू शकतात. त्यांचे काम अधिक सोपे होते. काही काळापूर्वी, गुगलने (Google) सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी कारची इन्फोटेनमेंट सिस्टम अपग्रेड करण्याच्या संदर्भात माहिती दिली होती. यालाच आता Google ने अपडेट केले आहे आणि आता Google ने अधिकृत ब्लॉग पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे, की, ज्यामध्ये नवीन Android Auto कोणत्या फीचर्सने सुसज्ज आहे हे सांगण्यात आलं आहे.

जर तुम्हीही तुमच्या कारमध्ये अँड्रॉइड इन्फोटेनमेंट सिस्टम वापरत असाल तर तुम्हाला या संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. कारण नवीन अँड्रॉइड ऑटोमुळे ड्रायव्हिंगचा अनुभव आता पूर्णपणे बदलणार आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Android Auto बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

तुम्ही Android Auto वरून झूम कॉल करू शकाल
 
Google ने स्पष्ट केलं आहे की, सिस्कोचे WebEx आणि Zoom सारखे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्स आता Android Auto वर उपलब्ध आहेत. हे केवळ ऑडिओपुरते मर्यादित असले तरी, यूजर्सना ड्रायव्हिंग करताना मीटिंग घेणे पुरेसे आहे. तसेच, कंपनीने अखंड मीटिंग अनुभवासाठी कारच्या इन्फोटेनमेंट सिस्टमसह म्यूट/अनम्यूट फंक्शन एकत्रित केले आहे. आता वापरकर्ते कारच्या डिस्प्लेवरून शेड्यूल केलेल्या मीटिंग आणि कॉन्फरन्स कॉलमध्ये अखंडपणे सामील होऊ शकतील.

Android Auto मध्ये मनोरंजनासाठी अॅप्स असतील 

Google ने निवडक कार कंपन्यांसाठी Android Auto मध्ये प्राईम व्हिडीओची सुविधा दिली आहे, जी तुम्ही Google Play Store द्वारे Renault, Polestar आणि Volvo कारमध्ये वापरू शकता. यासोबतच Google ने Android Auto साठी Vivaldi वेब ब्राउझरचा सपोर्ट देखील सादर केला आहे. याशिवाय द वेडल चॅनल अॅप अँड्रॉइड ऑटोमध्येही उपलब्ध असेल.

तुम्ही फोनद्वारे कार लॉक-अनलॉक करू शकता

Google ने डिजिटल की सपोर्टचा विस्तार केला आहे, ज्यामध्ये तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोनवरून तुमची कार लॉक, अनलॉक आणि सुरू करू शकाल. यासाठी यूजर्सकडे अँड्रॉइड आणि आयओएस फोन असायला हवेत. Google Auto च्या अपडेटेड व्हर्जनचे हे फीचर्स सध्या अमेरिका, कॅनडा आणि कोरियामधील Hyundai, Genesis आणि Kia च्या निवडक कारमध्ये उपलब्ध असतील. भारतात तरी सध्या हे व्हर्जन अपडेट करण्यात आलं नाही. 

महत्त्वाच्या बातम्या : 

iPhone 15 Series Pre Orders : आयफोन 15 सीरीजच्या प्री-ऑर्डर आजपासून सुरू, जाणून घ्या सर्व ऑफर्स

Related posts