Cwc Meeting Congress Leaders Hyderabad Telangana Assembly Election Strategy 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Congress Working Committee Meeting : देशभरातील काँग्रेस नेते आज हैदराबादमध्ये एकत्र येणार आहेत. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे काँग्रसचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या अध्यक्षतेखाली आज (16 सप्टेंबर) हैदराबाद मध्ये (Hyderabad) कॉंग्रेस कार्यकारिणीची (Congress Working Committee Meeting) दोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत तेलंगणासह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार असून, त्यासाठी रणनीतीही आखली जाणार आहे.

आजपासून दोन दिवस देशताली काँग्रेसचे नेते हैदराबादमध्ये असणार आहेत. कॉंग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक हैदराबादमध्ये पार पडणार आहे.
उद्या रविवारी (17 सप्टेंबर) काँग्रेस पक्षाची हैदराबादमध्ये विजयी रॅली निघणार आहे. तर तेलंगणा राज्यासाठी काही घोषणाही जाहीर करण्यात येणार आहेत.  मल्लिकार्जुन खर्रे यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेस कार्यकारिणीच्या नव्या टीमची घोषणा केली होती. त्यानंतर प्रथमच काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे.

सोनिया गांधींसह राहुल गांधीही उपस्थित राहणार

आज होणाऱ्या या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दोन दिवस चालणाऱ्या या सभेसाठी देशभरातील काँग्रेसचे छोटे-मोठे नेते हैदराबादमध्य जमायला सुरुवात झाली आहे.

बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाआघाडीवरही चर्चा होणार आहे. याशिवाय महागाई, बेरोजगारी, मणिपूर हिंसाचार आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती या मुद्द्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

विरोधकांच्या इंडिया आघाडीची एकजूट पुढे नेण्यावर भर

आगामी 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील रणनीती, विरोधकांच्या इंडिया आघाडीची एकजूट पुढे नेणे, आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि इतर अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. साहजिकच काँग्रेसने नुकतीच कार्यकारिणीची पुनर्रचना केली होती. ज्यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. सचिन पायलट आणि शशी थरूर यांसारख्या नेत्यांना या कार्यकारिणीत प्रथमच स्थान मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

इंडिया आघाडीचं ठरलं… मोदी सरकारविरोधात पहिली जाहीर सभा भोपाळमध्ये, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त

 

[ad_2]

Related posts