Consideration Of Diversion Of Excess Water Going To Gujarat To Marathwada Says Dcm Ajit Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Pawar : राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक मुंख्यमंत्र्यांनी आयोजीत केली आहे. या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात येणारे निर्णय हे मराठवाड्याला (Marathwada) चालना देणारे असतील असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm Ajit Pawar) यांनी केलं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. हा शेवट नाही तर ही सुरुवात असल्याचे अजित पवार म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा दिल्लीत उभा रहावा अशी माझी इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विचार करावा असेही अजित पवार म्हणाले. गुजरातकडे (Gujarat) जाणारं अतिरीक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा आमचा विचार असल्याचे अजित पवार म्हणाले.

विलासराव देशमुख यांच्या काळातही अनेक कामं झाली

महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एक रुपयात पिक विमा सुरु केला आहे. कृषीमंत्र्यांनी सूचना देखील दिल्या असल्याचे अजित पवार म्हणाले.  मराठवाड्यातील सर्व नेत्यांनी मराठवाड्याला न्याय देण्याचा निर्णय घेतला.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळातही अनेक कामं करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले. गुजरातकडे जाणार अतिरीक्त पाणी मराठवाड्यात कसं वळवता येईल हा आमचा विचार आहे. पालघर आणि ठाण्यातील पाणीही वळवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. नदीजोड प्रकल्पही केले जाणार आहेत. महायुतीच सरकार विकास हाच एकमेव अजेंडा यावरती काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. 

अनेक विभागांमध्ये तातडीची भरती प्रक्रिया राबवली जाणार

शासनाच्या अनेक विभागांमध्ये तातडीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.  काही विभागात तात्पुरत्या स्वरुपात बाहेरुन कंत्राटी भरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण तात्काळ भरती करता येत नव्हती. मात्र आम्ही सर्वजण कायमची भरती करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधक काहीही मुद्दा काढतात, भडकवण्याच काम करतात. मात्र त्यांना त्यांचं लखलाभ असे अजित पवार म्हणाले. 

मराठवाड्याच्या मातीनं अनेक संत आणि कलाकार दिले

मराठवाड्याला चार मुख्यमंत्री मिळाले. त्यांनी कायापालट करण्याचा प्रयत्न केला. या मातीनं अनेक संत आणि कलाकार दिल्याचे अजित पवार म्हणाले.  
अनेकवेळा पॅकेज दिलं जातं मात्र, त्याचा पाठपुरावा पालकमंत्र्यांनी केला पाहिजे, तरच कामं होतात असे अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये मी तसचं करतो. मराठवाड्यात स्वच्छता केली पाहिजे. बकालपणा नको असे अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या महत्त्वाच्या सूचना; म्हणाले…

[ad_2]

Related posts