Pune PMPML Bus News Pmpml Bus Driver Murder In Jambhulwadi Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात PMPML बस चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जांभूळवाडी भागात मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय 56वर्ष, रा. जांभूळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रात्री दोघे मित्र दारु पीत बसले होते आणि त्याच दरम्यान वादावादी झाल्याने हत्या केल्याची माहिती आहे.  या घटनेमुळे जांभुळवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर या प्रकरणाची  भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळाली आणि या पोलिसांनी तातडीने धाव घेतली. या प्रकरणी दोन जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.  जांभूळवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पीएमपीएमएलचे ड्रायव्हर दिवेकर आणि त्याचे मित्र हे एकत्र दारू पीत बसले होते. यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. याच कारणावरून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

PMPML बसचे पराक्रम समोर

मागील काही दिवसांपासून PMPML बसचे पराक्रम समोर येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी पुण्यात मद्यधुंद अवस्थेत PMPML चालवून अनेकांचा जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर आली होती. बस थेट नो एन्ट्रीमध्ये चालवल्याने बसचा लहान अपघातदेखील झाला होता. हडपसर, काळेपडळ येथील फराटे चौक येथे ही घटना घडली होती. बसमधील दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला होता. हडपसर, काळेपडळ येथील फराटे चौक, रेल्वे क्रॉसिंग जवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने प्रवासी बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेने नेल्यामुळे अपघात झाला. या बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. हे पाहून दोन तरुणांनी प्रसंगावधान रोखत बसगाडी वर ताबा मिळवत गाडी बाजूला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.  वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळल्यामुळे गणेश काळसाईत, मयुर बोराडे या दोन तरुणांनी हे धाडस केले होते. 

PMPML प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

मागील काही दिवसांपासून पुणे PMPML च्या बस अपघातात वाढ झाली आहे. चालकांचं नियंत्रण सुटून हे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात हजारो लोक रोज PMPML बसने प्रवास करतात. त्यातच असा हलगर्जीपणा जर PMPML बस चालकांकडून होत असेल तर नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार PMPML प्रशासनाला नसल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यांत जर कोणती जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण?, असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Weather Update : राज्यात कुठे यलो तर कुठे ऑरेन्ज अलर्ट, पुण्यात पावसाची स्थिती काय ?

 

 

 

[ad_2]

Related posts