[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
iPhone 15 : Apple ने iPhone 15 सीरीज लाँच केली आहे. कालपासून सर्व देशांमध्ये या फोनसाठी प्री-बुकिंग (iPhone Pre Booking) सुरू झाली आहे. ॲपलला विशेषत: प्रो मॉडेल्सच्या विविध कलर व्हेरियंटसाठी भरपूर ऑर्डर मिळाल्या आहेत. जर तुम्ही आयफोन 15 सीरीजचे प्री-बुकींग केले असेल तर तुम्हाला हा फोन कधी मिळेल? जाणून घ्या.
15 सीरीज प्रो मॉडेल्सची डिलिव्हरी नोव्हेंबरपर्यंत ढकलली
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, यूएस मध्ये आयफोन 15 सीरीज प्रो मॉडेल्सची डिलिव्हरी नोव्हेंबरपर्यंत ढकलण्यात आली आहे. यूएस व्यतिरिक्त, चीन, कॅनडा, भारत आणि इतर बाजारपेठांमध्ये डिलीव्हरीसाठी 8 आठवड्यांपर्यंत विलंब होऊ शकतो. भारतातील नैसर्गिक टायटॅनियम मॉडेल्ससाठी लोकांना 8 आठवड्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागू शकते. त्याच वेळी, प्रो मॅक्स मॉडेलच्या निळ्या आणि काळ्या व्हेरिएंटची डिलीव्हरी तारीख 16 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, पांढऱ्या रंगाचा मॉडेल 13 नोव्हेंबरपूर्वी ग्राहकांपर्यंत पोहोचणार नाहीत. एकूणच, ॲपलच्या नवीन सीरीजला जगभरातून प्रचंड मागणी मिळत आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple ने भारतात iPhone 15 आणि 15 Plus चे उत्पादन सुरू केले आहे.
डिलिव्हरीला विलंब
नुकतेच Apple कंपनीने आयफोन 15 सीरीज लाँच केली आहे. ज्यामध्ये Apple ने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लाँच करण्यात आले आहेत. तर iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max च्या प्री-ऑर्डर आजपासून भारतात सुरू झााल्या आहेत. प्री-बुकिंग दरम्यान कंपनीला इतक्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत की, डिलिव्हरीची तारीख अनेक देशांमध्ये नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
iPhone 15 सीरीज ऑफर
iPhone 15 फोन खरेदी करायचा असल्यास तुम्ही HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला iPhone 15 Pro आणि Pro Max वर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच, तुम्हाला iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तुम्ही iPhone 14 आणि 14 Plus खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. iPhone 13 वर 3000 रुपये आणि iPhone SE वर 2000 रुपयांची सूट मिळेल.
भारतात Apple 15 सीरीज किंमत
iPhone 15 (128 GB): 79,900 रुपये
iPhone 15 (256 GB): 89,900 रुपये
iPhone 15 (512GB): 1,09,900 रुपये
iPhone 15 Plus (128 GB): 89,900 रुपये
iPhone 15 Plus (256 GB): 99,900 रुपये
iPhone 15 Plus (512 GB): 1,19,900 रुपये
iPhone 15 Pro(128 GB): 1,34,900 रुपये
iPhone 15 Pro(256 GB): 1,44,900 रुपये
iPhone 15 Pro(512GB): 1,64,900 रुपये
iPhone 15 Pro (1 TB): 1,84,900 रुपये
iPhone 15 Pro Max (256 GB): ₹,59,900 रुपये
iPhone 15 Pro Max (512 GB): 1,79,900 रुपये
iPhone 15 Pro Max (1 TB): 1,99,900 रुपये
इतर महत्वाच्या बातम्या
iPhone 15 Series Pre Orders : आयफोन 15 सीरीजच्या प्री-ऑर्डर आजपासून सुरू, जाणून घ्या सर्व ऑफर्स
[ad_2]