Bhadrapada Purnima 2023 : आज भाद्रपद पौर्णिमेला 5 दुर्मिळ योग! शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या धनलाभासाठी उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhadrapada Purnima 2023 : पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील आज पौर्णिमा तिथी आहे. आज भाद्रपद पौर्णिमाचे व्रत केलं जातं.  पौर्णिमेला स्नान आणि दानला अतिशय महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील चंद्र दोष दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथी शुभ मानली जाते. या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणं चांगलं मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी नांदेत असं म्हणतात.  (bhadrapada purnima 2023 tithi snan daan muhurat moon time and importance and purnima upay )

भाद्रपद पौर्णिमा 2023 तिथी 

वैदिक पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमा तिथी गुरुवार 28 सप्टेंबरला संध्याकाळी 6:49 वाजता सुरु झाली असून ती आज दुपारी 3:26 वाजेपर्यंत असणार आहे. 

भाद्रपद पौर्णिमेला शुभ योगायोग

भाद्रपद पौर्णिमेला आज रवियोग जुळून आला आहे. याशिवाय आज वृद्धि योगदेखील आहे. तसंच सर्वार्थ सिद्धी योगासह 2 शुभ योग आहे. भाद्रपद पौर्णिमा स्नानाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग आहे. मात्र, हे दोन्ही योग रात्री तयार होत आहेत. अमृत ​​सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग रात्री 11:18 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:13 पर्यंत चालेल. भाद्रपद पौर्णिमा स्नानाला दिवसभर पंचक असतं. सकाळी 6.12 पासून रात्री 1.48 वाजेपर्यंत रवियोग आहे. यासोबत आज पंचक आहे. पंचकात अशुभ काम केलं जातं नाही. शिवाय भद्रकाल संध्याकाळ 06.49 ते दुसऱ्या दिवशी शनिवारी 30 सप्टेंबरला पहाटे 05.06 वाजेपर्यंत आहे. 

भाद्रपद पौर्णिमा चंद्रोदय वेळ 2023

चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 06:16 वाजता असून चंद्राला अर्घ्य दिला जातो. पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य अर्पण करणे महत्त्वाचं आहे. 

भाद्रपद पौर्णिमा व्रत पूजा विधी 

पौर्णिमेला पहाटे पवित्र नदीत स्नान केल्यानतंर स्वच्छ आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. जर तुमच्या शहरात नदी नसेल तर घरातही गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करा. यानंतर पौर्णिमा व्रताचा संकल्प घ्या. त्यानंतर भगवान सत्यनारायणाची विधिवत पूजा करा आणि व्रत कथा ऐका. त्यानंतर सत्यनारायणाला पंजिरी, पंचामृत आणि चुरमा अर्पण करा. त्यानंतर आरती करुन प्रसादाचे वाटप करा. त्याशिवाय या दिवशी दान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते.  

भाद्रपद पौर्णिमा धनप्राप्तीसाठी उपाय 

सत्यनारायणाच्या कथेचं पठण केल्यास आर्थिक लाभ होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय पौर्णिमा तिथीला सर्वार्थ सिद्धी आणि वृद्धी योगात लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.  या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करा. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मी वास असतो, असं म्हणतात. त्यासोबतच पौर्णिमेला अन्न, पाणी दान शुभ मानले जाते. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts