Team India Has Been The Most Successful Team Of Fisrt Asia Cup Know Who Is The Title Contender Asia Cup 2023 Sports Marathi New

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023 : आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय.. कारण, पुढील महिन्यात वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या आशिया चषकावर कोण नाव कोरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. रविवारी भारत आणि श्रीलंका या संघामध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. पण आशिया चषकाच्या इतिहासावर नजर मारल्यास सर्वात यशस्वी संघ टीम इंडिया आहे. 

1984 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 15 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडलीय. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं सहा वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आला आहे.  1984, 1988, 1990, 1995 भारताने आशिया चषकावर नाव कोरलेय. 1997 मध्ये श्रीलंकेनं आशिया चषकावर नाव कोरले होते. पाकिस्तानने 2000 मध्ये पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. 

 आशिया चषक विजेत्या संघाची संपूर्ण यादी:क्रमांक वर्ष विजयी संघ
1 1983/84 भारत
2 1985/86 श्रीलंका
3 1988/89 भारत
4 1990/91  भारत
5 1994/95  भारत
6 1997 श्रीलंका
7 2000  पाकिस्तान
8 2004  श्रीलंका
9 2008 श्रीलंका
10 2010  भारत
11 2011/12 पाकिस्तान
12 2013/14  श्रीलंका
13 2016  भारत (टी-20)
14 2018 भारत
15 2022 श्रीलंका (टी-20)

Asia Cup 2023 Final : आशिया चषाकाच्या जेतेपदासाठी भारत-श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने 

आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका  1988 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. या स्पर्धेत भारताने बाजी मारली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आतापर्यंत सातवेळा आशिया चषकाची फायनल रंगली होती. यामध्ये भारताने चारवेळा बाजी मारली आहे. तर श्रीलंका संघाने तीन वेळा स्पर्धेवर नाव कोरलेय.  भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये  1991 दुसऱ्यांदा फायनल झाली होती, यामध्ये भारताने बाजी मारली. तिसऱ्यांदा 1995 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यामध्येही भारताने बाजी मारली होती. भारताने सलग तीन वेळा श्रीलंकेला हरवत आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर श्रीलंका संघाने पलटवार करत भारताला फायनलमध्ये सलग तीन वेळा जेतेपद पटकावले होते. 

भारत आणि श्रीलंकामध्ये फायनलचा थरार 

गतविजेत्या श्रीलंका संघाने पाकिस्तानचा पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. कागदावर भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा अधिक मजबूत दिसत आहे. कारण, भारतीय संघात अनुभवाचा भरणा आहे. टीम इंडियात एकापेक्षा एक दिग्गज आहेत. त्याशिवाय गुणवंत खेळाडूही आहेत. पण अनुभव आणि गुणवत्ता योग्य वेळी कामाला येणार का? अशी शंका मनात सतावते. कारण, बांगलादेशविरोधात भारतीय संघाला पराभवचा सामना करावा लागला होता. बांगलादेशविरोधात काही कारण नसताना भारताचा पराभव झाला. पण रविवारी भारताला पुन्हा तीच चूक महागात ठरु शकतो. कारण हा आशिया चषकाचा अंतिम सामना आहे. 

[ad_2]

Related posts