X Launched Government Id Based Verification Feature For Paid Users Whst It Means And Know The Benefits In Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

X Government Id based verification Feature : इलाॅन मस्क यांनी जेव्हापासून X (Twitter) विकत घेतले तेव्हापासून त्यांनी अनेक बदल केले आहेत. नवनवीन अपडेट्स आणले आहेत. आता पुन्हा X (Twitter) युजर्सकरता एक नवीन फिचर लवकरच सुरू करणार आहेत. या फिचरच्या मदतीने युजर्सना सरकारी आयडीच्या मदतीने त्यांचे खाते व्हेरिफाय करण्याची परवानगी देण्यात येणार ​​आहे. सध्या तरी  हे फिचर सर्वांकरता उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. मात्र काही देशात हे फिचर सुरू करण्यात आले आहे. या वैशिष्ट्याद्वारे, कंपनी प्लॅटफॉर्म सुरक्षित करेल, युजर्सचे फ्रॉडपासून संरक्षण करेल आणि वयाशी संबंधित कंटेंटवर लक्ष केंद्रित करेल, असे सांगण्यात आले आहे.  

हे फिचरचा वापर करत असताना, तुम्हाला एक पाॅप-अप विंडो दिसेल. त्यात, ऑथराइजेशन फीचरला सोपे बनवण्याकरता X ने इज्राईल स्थित कंपनी AU10TIX सह भागीदारी करत असल्याचे लिहिले आहे. वापरकर्त्यांची सर्व माहिती जसे की फोटो, बायोमेट्रिक इत्यादी डेटा AU10TIX द्वारे 30 दिवसांसाठी सेव्ह केला जाईल. म्हणजेच कंपनी डेटाच्या आधारे यूजर्सची पडताळणी करेल. जर हे फिचर भारतात देखील लाइव्ह करण्यात आले, तर कंपनी कोणतीही भारतीय व्हेरिफिकेशन कंपनी/सेवा वापरू शकते.

ज्यावेळी एखादा पेड यूजर सरकारी आयडीच्या मदतीने त्यांचे खाते व्हेरिफाय करेल त्यावेळी त्याच्या अकाउंटवर “this account is ID verified” असे लिहिलेले दाखवेल. हे तेव्हाच होईल ज्यावेळी इतर कोणीतरी प्रीमियम यूजरच्या ब्ल्यू टिकवर क्लिक करेल. याशिवाय, अशा वापरकर्ते ज्यांनी त्यांचे खाते सरकारी आयडीने व्हेरिफाय केले आहे त्यांना कंपनी त्वरीत ब्लू टिक देईल. आणि अशा युजर्सना प्रोफाइल बदलणे, नाव बदलणे ही प्रक्रिया सोपी केली जाईल. मात्र, यात कोणत्या फिचर्सचा समावेश असू शकतो, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. पण यात सहभागी होणाऱ्यांना कंपनी काही अतिरिक्त फायदेही देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

X (Twitter) वर करता येणार 3 तासांचे व्हिडीओ पोस्ट

एलोन मस्क यांनी पेड यूजर्ससाठी आणखी एक नवीन वैशिष्ट्य दिले आहे. पेड यूजर्स आता X वर 3 तासांपर्यंतचे मोठे व्हिडीओ अपलोड करू शकतात. यूजर्स 1080p मध्ये 2 तासांपर्यंत आणि 720p मध्ये 3 तासांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करू शकतात. याशिवाय एलॉन मस्क यांनी सशुल्क यूजर्सना एअरप्लेची सुविधा दिली आहे. याअंतर्गत यूजर्स स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीओही प्ले करू शकतात. हे फीचर लांबलचक व्हिडीओ पाहण्यासाठी फायदेशीर आहे. X प्रीमियम यूजर्सना लोकप्रिय व्हिडीओंसाठी पिक्चर-इन-पिक्चर आणि ऑटो कॅप्शनसाठी समर्थन देखील मिळेल. याबरोबरच लाईव्हची व्हिडीओ क्वालिटीही यापूर्वी करण्यात आली आहे. मस्क यांनी अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी इमर्सिव्ह व्हिडीओ प्लेअरचे समर्थन केले आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Related posts