daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 17 September 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 17 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी कौटुंबाशी निगडीत काही दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्य आपल्याला साथ देईल आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांचा वेग वाढेल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी सहकार्यांशी संवाद साधताना आपले शब्द आणि विचार काळजीपूर्वक मांडा. नवीन रोजगार आणि नोकरी बदलण्यासाठी हा चांगला काळ नाही. 

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी तुम्ही ज्या अडचणींचा सामना करत होतात त्या अडचणी संपतील. रखडलेले कामंही पूर्ण होतील. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नवीन मार्ग देखील सापडतील. नशीब या वेळी आपल्यासोबत आहे, म्हणून काही नवीन काम करण्याची योजना करण्याची ही योग्य वेळ आहे.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी कौटुंबिक जीवन कुटुंबातील सर्व सदस्यांसह आनंदित आणि आरामदायक असेल. थोडे किंवा काही प्रयत्न करूनही पैसे मिळण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी तुम्ही पुन्हा परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर लवकरच या दिशेने पावले उचला. योजना पूर्णतः अंमलात आणता येतील आणि ते तुम्हाला फायदेशीर परिणाम देऊ शकतील. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही नवीन भागीदारी किंवा असोसिएशनमध्ये प्रवेश करू शकता 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी व्यावसायिक संदर्भात काही नवीन बदल होऊ शकतात. अधिका-यांशी वादापासून दूर राहिल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. रविवार या राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम राहील. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती कराल. हाती घेतलेल्या कामात चांगलं यश मिळेल. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी पैशांसाठी एखाद्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही चांगले संकेत मिळतील.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी ज्या गोष्टींकडे अडचण म्हणून पाहत आहात त्याच गोष्टी तुमच्यासाठी पुढं फायद्याच्या ठरणार आहेत. काही मित्रांची नकळत मदत होणार आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts