IPL 2023 Final Prize Money Details How Much Money IPL Winner Runner-Up Get GT Vs CSK Final

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Prize Money : आयपीएलच्या 16 व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर सामन्याला सुरुवात होईल. गतविजेता गुजरात आणि चार वेळा जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई संघामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. पण त्याआधीच क्रीडा चाहत्यांमध्ये बक्षिसांची चर्चा सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल विजेत्या संघाला गतवर्षी इतकी रक्कम देण्यात येणार आहे. त्याशिवाय ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, इमर्जिंग प्लेयर, गेम चेंजर, पॉवर प्लेयर, मोस्ट व्हॅल्यूएबलसह इतर अनेक व्यक्तिगत पुरस्कार जिंकणारे खेळाडूही मालामाल होणार आहेत.  (How Much money will IPL 2023 Winner get)

रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2023 चा चषक उंचावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला (क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेला संघ) सात कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. तर चौथ्या क्रमांकावरील संघाला 6.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.  रोहित शर्माच्या मुंबईला सात कोटी तर कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील लखनौ संघाचे 6.5 कोटी रुपयांचे बक्षिस निश्चित झालेय. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातात. ऑरेंज कॅप शुभमन गिल याच्याच डोक्यावर राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पर्पल कॅपही मोहम्मद शमी अथवा राशिद खान यांच्यापैकी एकजण पटकावू शकतो.   

आयपीएल 2023 मध्ये कुणाला किती रक्कम मिळणार ?














Award Prize Money (in rupees)
पर्पल कॅप विजेता 15 लाख
ऑरेंज कॅप विजेता 15 लाख
सुपर स्ट्राईकर  15 लाख
Crack it sixes of the season 12 लाख
पॉवर प्लेयर 12 लाख
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर 12 लाख
गेम चेंजर 12 लाख
इमर्जिंग प्लेयर 20 लाख
परफेक्ट कॅच ऑफ द सीजन 12 लाख
सामनावीर (फायनल) 5 लाख




2008 पासून विजेत्या संघाला किती रक्कम दिली गेली?

IPL 2008 – 4.8 कोटी रुपये 
IPL 2009 – 6 कोटी रुपये
IPL 2010 – 8 कोटी रुपये
IPL 2011 – 10 कोटी रुपये
IPL 2012 – 10 कोटी रुपये
IPL 2013 – 10 कोटी रुपये
IPL 2014 – 15 कोटी रुपये
IPL 2015 – 15 कोटी रुपये
IPL 2016 – 20 कोटी रुपये
IPL 2017 – 15 कोटी रुपये
IPL 2018 – 20 कोटी रुपये
IPL 2019 – 20 कोटी रुपये
IPL 2020 – 10 कोटी रुपये
IPL 2021 – 20 कोटी रुपये
IPL 2022 – 20 कोटी रुपये

आणखी वाचा :

WTC विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पण IPL विजेत्यापुढे ही रक्कम किरकोळ

[ad_2]

Related posts