Varalaxmi Vratham 2023 : वरदलक्ष्मी व्रतला 3 शुभ योग! बरसणार माता लक्ष्मीची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shravan Varad Lakshmi Vrat in marathi : श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला खास महत्त्व आहे. श्रावण सोमवार, मंगळवारी – मंगळागौर आणि शुक्रवारी जिवतीची पूजा किंवा जरा जिवंतिका पूजा केली जाते. आजचा शुक्रवार अतिशय खास आहे. कारण आज जरा जिवंतिकासोबत वरदलक्ष्मी व्रत पाळलं जाणार आहे. असं म्हणतात लक्ष्मी मातेची पूजा केल्याने इच्छित वरदान मिळतं आणि धनलाभ होतो. (varalakshmi vrat puja muhurat vidhi maa laxmi mantra shravan varad lakshmi vrat 2023 in marathi) वरदलक्ष्मी व्रताची तारीख, शुभ वेळ, उपासना पद्धत, मंत्र आणि शुभ योग जाणून घेऊया.
 

वरदलक्ष्मी व्रत 2023 मुहूर्त (Varalakshmi Vrat 2023 Muhurat)

सिंह लग्न पूजा मुहूर्त  – पहाटे 05:55 वाजेपासून सकाळी 07:42 वाजेपर्यंत 
वृश्चिक आरोही पूजा मुहूर्त  – दुपारी 12:17 वाजेपासून दुपारी 02:36 वाजेपर्यंत
कुंभ लग्न पूजा मुहूर्त  – संध्याकाळी 06:22 वाजेपासून 07:50 वाजेपर्यंत 
वृषभ लग्न पूजा मुहूर्त – रात्री 10:50 वाजेपासून 26 ऑगस्टला मध्यरात्री 12:45 वाजेपर्यंत 

वरदलक्ष्मी व्रत 2023 शुभ योग  (Varalakshmi Vrat 2023 Shubh yoga)

वरलक्ष्मी व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि बुधादित्य योग यांचा संयोग जुळून आला आहे. 

रवि योग – सकाळी 09.14 वाजेपासून 26 ऑगस्ट 2023 पहाटे 05.56 वाजेपर्यंत
सर्वार्थ सिद्धी योग – सकाळी 05.55 वाजेपासून सकाळी 09.14 वाजेपर्यंत

वरदलक्ष्मी व्रत पूजा साहित्य (Varalakshmi Vrat Samagri)

पूजा चौकी, रांगोळी, लाल कापड, कापड, नारळ, कुंकू, आंब्याची पाने, सुपारीची पाने, दही, फळे, फुले, दुर्वा, दिवा, माऊली, आरसा, कंगवा, केळी, कलश, माँ वरलक्ष्मीच्या पूजेसाठी लाल वस्त्र, चंदन. , हळद , अक्षत , हळद , पंचामृत, कापूर दूध , खीर , कमल गट्टा.

वरदलक्ष्मी व्रत पूजा विधी (Varalakshmi Vrat 2023 Puja vidhi)

सकाळी उठून स्नान झाल्यावर महिलांनी लाल रंगाचे कपडे घालावे. काही ठिकाणी पांढरे कपडेही घातले जातात. 
पूजा स्थळी गंगेचे पाणी शिंपडून पूजास्थान शुद्ध करुन रांगोळी काढा. 
आता त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडून त्यावर लाल कपडा घाला. 
आता माता लक्ष्मी आणि गणरायाची मूर्ती स्थापन करा.  
माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला तांदूळ ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापन करा. कलशात आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. हे करताना माता वरदलक्ष्मीच्या मंत्राचा जप करा.
आता माता वरलक्ष्मीचे आवाहन करताना चंदन, हळद, कुमकुम यांनी हार घाला. सोळा अलंकार अर्पण करा.
मोली बांधून आईला नारळ अर्पण करा, नंतर खीर अर्पण करा आणि वरलक्ष्मी व्रताची कथा वाचा. आता आरती करून प्रसाद वाटप करा.

वरदलक्ष्मी व्रत पूजा मंत्र  (Varalakshmi Vrat Mantra)

या श्री: स्वयं सुकृतिनां भवनेष्वलक्ष्मी:

पापात्मनां कृतधियां हृदयेषु बुद्धि:।

श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा

तां त्वां नता: स्म परिपालय देवि विश्वम्॥

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts