Madhya Pradesh News Muslim Girl Hindu Boy Out For Dinner Manhandled By Indore Mob Video Viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मध्यप्रदेश :  मध्य प्रदेशातील इंदौर शहरात एक धक्कादयक घटना घडली असून हिंदू मुलाबरोबर फिरते म्हणून एका तरूणीचा भररस्त्यात  छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेच्या व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. 

इंदौर  येथील या व्हिडीओमध्ये काही तरूण भर रस्त्यात एका मुलीला दम देताना आणि तिला त्रास देताना दिसत आहेत. हे तीन ते चार तरुण मुलीला त्रास देताना, तिचा फोन हिसकावून घेताना तसेच एवढ्या रात्री हिजाब घालून कुठे फिरते? असे प्रश्न विचारत आहे.  यावर तरूणीने मी घरी सांगून मित्राबरोबर बाहेर जेवण्यासाठी गेले होते असे सांगितले.  या मुलीसोबत टवाळखोरी करतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मदतीसाठी गेलेल्या दोन जणांवर चाकूने हल्ला

अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश रघुवंशी म्हणाले, इंदौर शहरात रात्री 11 वाजता  एका समुहाने दोन वेगळ्या धर्माच्या तरूण-तरूणीला हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिले त्यानंतर त्यांचा गाडीवर पाठलाग करत त्यांना घेरले. घटनास्थाळी झालेली गर्दी पाहता दोन नागरिक तरूण- तरूणीच्या मदतीसाठी पुढे गेले तर उपस्थितांपैकी एका व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला करत जखमी केले.

व्हायरल व्हिडीओ:

जमावाने तरूणाला मारहाण, शिवीगाळ केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणाने एफआयआर दाखल केली आहे. तसेच तरुणाने उपस्थित जमावाने मारहाण, शिवीगाळ देखील केल्याचे म्हटले आहे. अशी जोडपी शहराचे वातावरण देखील खराब करत आहे, असे म्हणत जमावातील हा तरूणाने आधार कार्डची मागणी केल्याचे देखील सांगितले. तसेच नाव, मोबाईल नंबर विचारत एक व्हिडीओ देखील बनवला आहे.

कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी दमदाटी करणाऱ्या तरूणांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा हातात घेतलेल्या तरूणांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इंदौरच्या तुकोगंज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. 

आतापर्यंत सात जणांना अटक

आतापर्यंत सात आरोपींची ओळख पटली असून शोएब लतीफ (23), मुजम्मिल खान (26), दानिश शेख (28), अरबाज शेख (23), शावेज शेख (27) आणि आवेश हनीफ यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा :

 जळगावमध्ये तरुणीचा तरुणावर भररस्त्यात चाकू हल्ला, घटनेचा व्हिडीओ व्हायरल



[ad_2]

Related posts