Maharashtra Politics Ajit Pawar VS Rohit Pawar In Pimpri Chinchwad Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) पिंपरी चिंचवड (PCMC News) हा बालेकिल्ला अजित पवारांच्या (Ajit Pawar) हातून पुन्हा काबीज करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आपला नातू आणि आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं नजिकच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार विरुद्ध रोहित पवार या काकापुतण्यांमधला सामना पाहायला मिळू शकतो.

बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची दादागिरी चालते. हाच बालेकिल्ला पुन्हा एकदा शरद पवारांना काबीज करायचा आहे. यासाठी पवारांनी त्यांचा नातू आणि खास शिलेदार आमदार रोहित पवारांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरात काका अजित पवार विरुद्ध पुतणे रोहित पवार असा सामना पहायला मिळू शकतो.

 सत्तासंघर्षावेळी काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार हा सामना सर्वांनी पाहिलाच. पण आता त्यापुढील सत्तासंघर्षाचा अंक हा काका अजित पवार विरुद्ध पुतणे रोहित पवारांमध्ये रंगलेला पाहायला मिळू शकतो. पिंपरी चिंचवडमधील रोहित पवारांचा आजच्या दौऱ्यात त्यांनी पवार साहेबांमुळंच अजित दादांचं शहरात महत्त्व वाढल्याचं बोलून दाखवलं. 

 राज्यातील सत्तासंघर्षांनंतर पहिली निवडणूक ही लोकसभेची होणार आहे. त्यावेळी मावळ लोकसभेकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून असेल, अजित दादांचे पुत्र पार्थ पवार इथून पुन्हा एकदा स्वतःच नशीब अजमावू शकतात. तर स्थानिक नेत्यांना महापालिकेत सत्ता काबीज करायची आहे. अशात रोहित पवारांची जादू चालली तर काकांची डोकेदुखी वाढू शकते. पण तूर्तास अजित दादांच्या गटाने याबाबत अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे. 

1991 पूर्वी पिंपरी चिंचवडची धुरा शरद पवारांच्या हाती होती, नंतर शरद पवारांनीच या शहराची सूत्र पुतण्या अजित पवारांच्या हाती दिली. अजित पवारांनी  शहरात एकहाती सत्ता काबीज करून बारामती खालोखाल पिंपरी चिंचवडला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवला. पण आता पुलाखालून बरंच पाणी गेल्यानं शरद पवारांनी नातू रोहित पवारांवर पिंपरी चिंचवडची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळं यानिमित्ताने काका अजित पवार विरुद्ध पुतणे रोहित पवार असा सामना रंगलेला पाहायला मिळू शकतो.राज्यातील सत्तासंघर्षानंतर देशात पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावू शकतात. त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये पवार कुटुंबीयांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

हे ही वाचा :

अजित पवार सत्तेत येताच पुत्र पार्थ आणि जय पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये; पुण्यातील कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र

[ad_2]

Related posts