Ganesh Chaturthi Celebrations Chhatrapati Sambhajinagar Is Ready To Welcome Ganapati Bappa Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : राज्यातच नव्हे तर देशभरात आज गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साहा पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, मोठ्या उत्साहात आज ठिकठिकाणी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. घरघुती गणपतींपासून तर मंडळाची देखील सर्व तयारी झाली आहे. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी पोलीस देखील तयार आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनग शहर पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या काळात तब्बल 2 हजार 700 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. 

संभाजीनगर शहरातील मानाचा आणि शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपतीचे पूजन करूनच शहरातील गणेशोत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. राजाबाजार येथील संस्थान गणपती हे शहराचे ग्रामदैवत होय. या मंदिरात आरती करूनच शहरात विविध धार्मिक शोभायात्रांना सुरुवात होत असते. साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही गणेशमूर्ती आहे. दोन बाय दोन फुटांच्या आकाराची मूर्ती डाव्या सोंडेची असून, काळ्या दगडातील स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीवर शेंदुराचा जाड थर चढला होता. यामुळे मूर्ती शेंदूरवर्णीय झाली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी शेंदूर काढण्यात आला. आता मूळ रुपात संस्थान गणपती दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडू मातीच्या उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

दोन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त, 5 सहायक आयुक्त, 28 पोलीस निरीक्षक, 74 सहायक निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 590 पुरुष तर 115 महिला अंमलदार बंदोबस्तावर तैनात असतील. याशिवाय बाहेरून आलेला राज्य राखीव पोलीस दल आणि रॅपिड अॅक्शन फोर्स आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त असणार आहे. 21 संवेदनशील ठिकाणी 16 अधिकारी, 84 अंमलदारांचे फिक्स पॉईंट असतील. 62 अंमलदार महत्त्वाच्या 31 भागांमध्ये पायी घालतील. 148 बीट मार्शल रात्री पेट्रोलिंग करतील. तसेच, प्रत्येक ठाण्यात एक म्हणजे, 17 उपनिरीक्षक आणि 205 अंमलदार राखीव असतील.

गणेश मंडळाची गर्दी होणार…

शहरातील औरंगपुरा भागात मोठ्या प्रमाणात बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून मूर्ती विकत घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, वेगवेगळे मंडळ देखील येथून मूर्ती घेतात. तर ढोल ताशांच्या गजरात आपल्या बाप्पाला घेऊन नेताना गणेश मंडळात मोठा उत्साहा पाहायला मिळत असतो. त्यामुळे या परिसरात आज दिवसभर प्रचंड गर्दी पाहायला मिळत असते.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ganeshostav 2023 : विघ्नहर्ता, लंबोदर, शूर्पकर्ण बाप्पाची ही नावं तर माहितच असतील, पण गणपतीची ‘ही’ नावं कधी ऐकली आहेत का?

[ad_2]

Related posts