Pune Gnaeshotsav 2023 Ganeshotsav Celebration Started In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : गणेशोत्सवाला आजपासून  जल्लोषात सुरुवात  (Pune ganeshotsav 2023)  होणार आहे. या गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज झालं आहे. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत आहे. तर ढोल ताशा पथकंदेखील मिरवणूक गाजवायला सज्ज झाले झाले आहे. संपूर्ण पुण्यात मंगलमय वातावरण झालं आहे. तर पुण्यातील प्रत्येक घरात आता बाप्पाची ओढ दिसत आहे. यातच पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकी पाहण्यासाठी अनेक पुणेकर लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर एकत्र यायला सुरुवात झाली आहे.

सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 7:45 वाजता आरती झाली आहे. आजपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. आरती होईल बाप्पाचा जयजयकार होईल आणि नंतर मिरवणूक काढण्यात येणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या मिरणवुकीसाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील मंडई परिसरात, बेलबाग चौकात आणि लक्ष्मी रस्त्यांवर मोठ-मोठ्या रांगोळ्या काढण्यात येत आहे. पुण्यातूनच नाही वेगवेगळ्या गावातून रांगोळी कलाकार पुण्यात आले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज झाले आहे. 

ढोल ताशा पथकं सज्ज…

मागील तीन महिन्यांपासून ढोल ताशा पथकांचा सराव सुरु होता. या हजारो वादक आजच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे हजारो वादक पुण्याच्या मध्यवर्ती भागात वादनासाठी एकत्र जमले आहेत. अनेकांना गणरायाच्या आगमनाची आता ओढ लागली आहे. बेलबाग चौकात, लक्ष्मी रस्त्यावर आणि प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज झाले आहे. 

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ॐकार महाला’त होणार विराजमान

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने दरवर्षी भव्य महालाच्या प्रतिकृती असलेले देखावे साकारले जातात. यंदाही असाच राजेशाही थाटमाट असलेला ‘ॐकार महाल’ हा काल्पनिक देखावा साकारण्यात आला आहे, या देखाव्याची संकल्पना जान्हवी धारिवाल- बालन यांची असून यावरील नक्षीकाम प्राचीन शैलीतील कापडाची प्रेरणा घेऊन आणि प्रसिध्द अशा ‘कुंदन’ या अलंकाराप्रमाणे साकारण्यात आले आहे. त्यासोबतच या महालाला सुंदर अशा फुलांचा साज चढवण्यात आला आहे. या महालाच्या गाभाऱ्यातील छतावर ‘ॐ गं गणपतये नमो नम: ’ हा मंत्र लिहलेला आहे. त्यामुळे या गाभाऱ्यात होणाऱ्या मंत्रोच्चारामुळे येथील वातावरण कायमच प्रसन्न आणि भक्तीमय राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Ganeshotsav Pune Traffic : पुणेकरांनो घरच्या बाप्पाला आणयला बाहेर पडताय? मग वाहतुकीतील बदल नक्की बघा!

[ad_2]

Related posts