Father Was Killed By His Son In Resort Stabbed While He Was Fast Asleep Pune Crime News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : गणेशचतुर्थीला पुण्यातून (Pune Crime News) धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोटच्या पोरानेच (Pune news) वडिलांची हत्या (Father murder) केल्याची घटना समोर आली आहे. काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर  (Father) कात्रीने सपासप वार करुन त्यांची हत्या (Murder) केली आहे.  हा संपूर्ण प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून समोर आला आहे. या प्रकारामुळे विश्रांतवाडीत (Vishrantwadi area) सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
 
काम कर, चांगला रहा, असं वडिलांनी सांगितलं. हे ऐकून मुलाचा राग अनावर झाला. त्यानंतर त्याने थेट वडिलांवर सपासप वार करायला सुरुवात केली. ही सगळी झटापट सुरु असताना आईने अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने थेट आईवरही वार करायला सुरुवात केली. या प्रकरणी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय 55, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर आरोपी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय 20 ) याला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय 36 , रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुलगा शिवनाथ हा काहीही काम करत नव्हता. त्यामुळे वडिल आणि त्याच्यात वादावादी सुरु रहायची. वडिलांनी त्याला काम करण्यासाठी सांगितलं आणि चांगला रहा, म्हणून बजावलं. मात्र वडिलांचे हे शब्द ऐकून मुलाचा राग अनावर झाला आणि झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने सपासप वार केले. यात त्यांच्या छाती आणि पोटावर वार करण्यात आले.

नात्यांचं काय?, वडिलांचा धाक गेला कुठे?

काही दिवसांपूर्वी बीड शहरातून अशीच घटना पुढे आली होती. पोटाच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या (Murder) केली होती. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने या आरोपी मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली होती. दरम्यान, या मारहाणीत बापाचा तीन दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बीडच्या आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथे ही घटना घडली होती. तर या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांतीलाल सूर्यभान नरवडे (वय 54 वर्षे) असे मृताचे नाव होतं. तर योगेश नरवडे असे आरोपी मुलाचे नाव होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Pune Gnaeshotsav 2023 : आतुरता आगमनाची! शेकडो ढोल वादक, रांगोळ्यांच्या पायघड्या, पुण्यात गणेशोत्सवाला जल्लोषात सुरुवात

[ad_2]

Related posts