Viral Video : गंभीर आजारावर मात करून ‘ती’ मृत्यूचा दाढेतून परतली, व्हिडीओतून दाखवला प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending Video : रस्ते अपघातात रोज असंख्य लोक आपले जीव गमवत असतात. तर काही जणांना आयुष्यभर मरण यातना सहन करावे लागते. गंभीर दुखापत, हाता पायांची हालचाल नाही, दुसऱ्यांवर अलवंबून राहावं लागतं. यापेक्षा मरण आलं असतं तर बरं झालं असतं अशी भावना या लोकांच्या मनात सतत येत असते. पण एखाद्या व्यक्तीच्या धैर्याने तो या संकटावर मात करतो. सोशल मीडियावर अशा एका संघर्षाची कहाणी यूजर्सचं लक्षवेधून घेते आहे. (viral video brain injury survivor girl shares her emotional story on Instagram trending now)

इंस्टाग्राम अकाऊंटवर लायला रोगन या तरुणीचा रस्ते अपघातमध्ये ब्रेन इंज्युरी सर्व्हायव्हर हा गंभीर आजार झाला होता. तिचा हा अपघात एक वर्षापूर्वी झाला होता. ती जगू शकणार असंच डॉक्टरांपासून सगळ्यांना पाहून वाटतं होतं. पण ती निराश झाली नाही. विश्वास आणि शक्तीच्या जोरावर तिने या संकटावर मात केली. या संघर्षात तिच्या आईने साथ दिली. 

तिची आई सांगते, या अपघातातून त्यांना आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण मिळाली. आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्या स्वत:वर ताबा राहत नाही. मग अशावेळी गोष्टी आपल्या हातात न राहतात सगळं वेगाने बदलतं. त्यावेळी आपण फक्त निराश आणि हताश होऊन बघत राहतो. 

मी कधीही अशा आयुष्याचा विचार करु शकत नाही. जिथे माझी मुलगी माझ्यासोबत नसेल. ती जिवंत असेल आणि माझ्यासोबत असेल तर आम्ही कुठल्याही संकटावर मात करु शकतो. पण देव आहे, तो मला प्रत्येक संकटातून परत खंबीरपणे उभा करतो. 

मुलीच्या अपघातानंतर तिला असं पलंगावर पाहून वाटलं आपलं जग संपलं. पण देवाच्या मनात काही औरच होतं. मुलीच्या जिद्दने आणि देवाच्या आशिर्वादाने माझी मुलगी पुन्हा उभी राहिली. आज वर्षभरानंतर तिला पाहिलं की सगळं कसं चमत्कारासारखं वाटतं. 

अपघातात तिच्या मेंदूला दुखापत झाली होती, तेव्हा ती 15 वर्षांची होती. गेल्या वर्षी जूनमध्ये तिने डोळे उघडले खरी पण ती बोलू शकतं नव्हती. ना तिला चालता येतं होतं, ना काही खाता येत होतं. ती कोमामध्ये होती. अपघाताच्यावेळी काय झालं तिला आठवत नाही, की ती महिनाभर कोमात होती तेही तिला माहिती आहे. 

Related posts