Ipl 2023 Gt Vs Mi Qualifier 2 Mohit Sharma Takes 5 Wicket Haul Against Mi And Registers His Best Bowling Figure

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Premier League 2023: गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात शुभमन गिल आणि मोहित शर्मा यांनी दमदार कामगिरी केली. मोहित शर्मा याने दहा धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला. ३४ वर्षीय मोहित शर्ममा याने तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदारप्ण केलेय. मोहित शर्मा गुजरातच्या संघात नेट बॉलर म्हणून खेळत होता. पण त्यानंतर गुजरात संघाने मोहित शर्माला संधी दिली… त्यानंतर मोहित शर्माने दमदार कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.

२०२२ च्या लिलावात मोहित शर्म अनसोल्ड राहिला होत. कोणत्याही संघाने मोहित शर्मा याला खरेदी केले नाही. अनसोल्ड राहिल्यानंतर मोहित शर्मा गुजरातच्या संघासाठी नेट बॉलर होता..यंदाच्या हंगामात गुजरातने मोहित शर्मा याला मुख्य संघाचा सदस्य म्हणून करार केला. मोहित शर्मा याने गुजरातचा निर्णय सार्तकी ठरवला. १३ सामन्यात मोहित शर्मा याने २४ विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात मोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मोहित शर्माच्या परतीचा प्रवास खडतर राहिलाय. 

तब्बल तीन वर्षानंतर दमदार पुनरामन
मोहित शर्माने तब्ब्ल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. याआधी मोहित आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर यंदाच्या मोसमात त्यानं तब्बल तीन वर्षानंतर मोहितनं आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलं आहे.

100 विकेट घेणारा 23वा गोलंदाज
आयपीएलमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण करणारा मोहित शर्मा हा 23 वा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंतच्या 92 सामन्यांत 25.95 च्या सरासरीने आणि 8.36 च्या इकॉनॉमी रेटने 100 गडी बाद केले आहेत. 10 धावांत 5 गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सध्याच्या आयपीएल (IPL 2023) हंगामात मोहितच्या दमदार गोलंदाजीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आयपीएल 2023 मध्ये, त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये 15.63 च्या सरासरीने आणि 6.94 च्या इकॉनॉमी रेटने 8 विकेट घेतल्या आहेत.

‘या’ कारणामुळे तीन वर्ष आयपीएलपासून दूर
आयपीएल 2022 मध्ये मोहित गुजरात संघाचा नेट गोलंदाज होता आणि यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात त्याला आयपीएल 2023 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 34 वर्षीय मोहित खराब फॉर्म आणि नंतर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात मोहितला गुजरातकडून गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि मोहितनं या संधीचा पुरेपुर फायदा घेत चमकदार कामगिरी केली.

आशिष नेहराचा मोहित शर्मा फोन

पंजाब किंग्सवर विजय मिळवल्या मोहित शर्माने मागील तीन वर्षांचा त्याचा प्रवास सांगितला. मोहितने सांगितलं की, ”मी पदार्पणाबद्दल उत्सुक होतो. पण, अनेक वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करताना थोडी धाकधूकही होती. मागील वर्षी पाठीच्या शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर मी देशांतर्गत क्रिकेट खेळलो. मी देशांतर्गत क्रिकेट खेळलो आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यानंतर मला गेल्या मोसमात आशिष नेहराचा फोन आला. त्याने मला गुजरात टायटन्ससाठी नेट गोलंदाज म्हणून बोलवलं. घरी बसण्यापेक्षा मी नेट बॉलर बननं पसंत केलं.” त्यानंतर यंदा मोहितला गुजरात संघातून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने उत्तम दोन विकेट घेतल्या.

हार्दिक पांड्याने मोहित शर्माला दिली संधी

यंदाच्या मोसमात मोहित शर्माने तब्ब्ल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी मोहित आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर आता तीन वर्षानंतर मोहितनं आयपीएल टी 20 लीगमध्ये दमदार पदार्पण केलं आहे. या सामन्यात त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हार्दिक पांड्याने संधी दिल्यानं मोहित शर्माचं नशीब पुन्हा एकदा उजळलं आहे.

आयपीएल 2017 पर्यंत कायम होती मोहितची जादू 

यानंतर मोहितने चेन्नईसाठी सातत्याने महत्त्वाच्या गोलंदाजाची भूमिका बजावली. आयपीएल 2017 पर्यंत त्याने आपल्या गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना अडचणीत आणलं होतं. पण त्यानंतर त्याचा खराब फॉर्म सुरू झाला. आयपीएल 2018 ते आयपीएल 2020 पर्यंत मोहितला फक्त 11 सामने खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2021 आणि आयपीएल 2022 मध्ये तो सामील नव्हता होता. त्यानंतर आयपीएल 2022 मध्ये मोहित शर्मा नेट बॉलर राहिला होता. मात्र, 34 वर्षीय मोहितने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं आहे.

2013 मध्ये आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण

2013 मध्ये मोहित शर्माने आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये पदार्पण केलं. तो एकेकाळी टीम इंडियाच्या वनडे संघाचा महत्त्वाचा भाग होता. मोहित शर्माने 2013 ते 2015 दरम्यान, भारतीय संघासाठी 26 एकदिवसीय सामने खेळले आहेत.. मोहितने आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 37 विकेट घेतल्या आहेत. 

धोनीने चेन्नई संघासाठी केली निवड 

मोहित शर्मा 2012-13 रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला होता. त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला धोनीने चेन्नई संघात स्थान दिलं होतं. आयपीएल 2013 (IPL 2013) मध्ये तो चेन्नई संघाचा भाग होता.  मोहितने आयपीएलच्या पहिल्या सत्रात 20 विकेट घेतल्या होत्या. याच कारणामुळे त्याला यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

[ad_2]

Related posts