Admission Procces In Best Graduation College In Pune FC SP BMCC-Garware Modern College Start Know About It

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Admission Open In Pune Colleges :  25 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होताच आता मिशन अॅडमिशन सुरु झालं आहे. राज्यातील विविध भागातून विद्यार्थी पुण्यातील महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी येत असतात. पुण्यातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याचं महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. पुण्यातील महाविद्यालयात मेरीटनुसार प्रवेश मिळतो. त्यामुळे बारावीत मिळालेल्या मार्कांना फार महत्व असतं. बारावीच्या मार्कांच्या आधारे अनेक महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. त्यातच पुण्यातील नामवंत काही महाविद्यालात प्रवेशपूर्व ऑनलाईन  नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे तर काही महाविद्यालयातील प्रवेश अर्ज नोंदणीला सुरुवात व्हायची आहे. त्यात फर्ग्युसन कॉलेज, एस. पी. कॉलेज. मॉडर्न कॉलेज, गरवारे कॉलेज आणि कॉमर्ससाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं बीएमसीसी कॉलेज या सगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकही ईच्छूक असतात. कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी आहे, पाहुया…

फर्ग्युसन कॉलेज:

फर्ग्यूसन  महाविद्यालयाचे बीए बीएससी आणि युवक या अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज 27 मे ते 10 जून या कालावधीत भरता येणार आहेत. 14जून रोजी यादी प्रसिद्ध होईल. 20 जून रोजी प्रवेशाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.  फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी अभ्यासक्रमाच्या 570 जागा उपलब्ध आहेत.प्रवेशाची अधिक माहिती www.fergusson.edu या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बीएमसीसी : 

बीएमसीसी मधील विविध प्रवेशाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 5 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. registration.deccansociety.org/Registration/Apply/BMCC या बेवसाईटवर प्रवेशअर्जाची प्रक्रिया पूर्ण करावे लागलीत. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 14  जून रोजी प्रसिद्ध केले जाईल.

एस.पी.कॉलेज : 

एस पी कॉलेजमध्ये 1 ते 15 जून या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए या अभ्यासक्रमासाठी हे अर्ज असतील. त्यांच्या https://www.spcollegepune.ac.in/ या वेबसाईटवर सगळ्या अभ्याक्रमाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. विषय निवडीसंदर्भातदेखील माहिती घेता येणार आहे. 

आबासाहेब गरवारे कॉलेज : 

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात 29 मे रोजी प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीएससी बायोटेक्नॉलॉजी ,बीसीए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. https://garwarecollege.mespune.in/ या बेवसाईटवर संपूर्ण अभ्यासक्रमांबाबतची माहिती उपलब्ध आहे. 

मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर

मॉडर्न महाविद्यालयातर्फे विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना येत्या 13 जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मॉडेल कॉलेजच्या moderncollegepune.edu.in या संकेतस्थळावर प्रवेश याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts