( प्रगत भारत । pragatbharat.com)
Jupiter Vakri In Mesh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह वेळोवेळी वक्री आणि मार्गी देखील होतात. ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम आणि सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.
आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक असलेला गुरु 4 सप्टेंबर रोजी मेष राशीत वक्री झाला आहे. बृहस्पति सुमारे 4 महिने वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहे. अशावेळी काही राशींना गुरुच्या वक्री चालीमुळे 3 राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया गुरुच्या वक्री चालीचा कोणच्या राशींच्या व्यक्तींना फायदा होतोय.
सिंह रास (Leo Zodiac)
बृहस्पति वक्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मुलाला नोकरी मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. गुरूच्या प्रतिगामी गतीमुळे तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ खूप चांगला आहे.
धनु रास (Dhanu Zodiac)
धनु राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची वक्री गती अनुकूल ठरू शकते. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होण्याची शक्यता आहे. नवीन ऊर्जा प्रवाहित होऊ शकते. व्यवसायातही यश मिळाल्याने अधिक नफा मिळण्याची संधी आहे. यावेळी मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
मकर रास (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी गुरूची प्रतिगामी गती फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. कौटुंबिक संबंधांच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला राहील. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी काही ना काही मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)