How Many Overs Will Be Played In IPL Final 2023 After The Rain In Narendra Modi Stadium Ahmedabad ; आयपीएल फायनलच्या दिवशी पाऊस पडणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद : आयपीएलच्या चाहत्यांना आता सर्वात जास्त भिती वाट असेल ती पावसाची. कारण आयपीएलच्या फायनच्या दिवशी आता पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. पण जर पाऊस पडला तर फायनलचा सामना किती षटकांचा खेळवला जाऊ शकतो, ही माहिती आता समोर आली आहे.अहमदाबाद येथे संध्याकाळी ६-७ या वेळेत ५० टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आयपीएलचा सामना सुरु होण्यापूर्वी पावसाचे आगमम होणार असल्याचे म्हटले गेले आहे. पण हा पाऊस किती वेळ पडतो, हे सर्वांत महत्वाचे असेल. पण चाहत्यांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असेल की पाऊस कधी थांबणार. कारण पाऊस थांबल्या शिवाय हा सामना सुरु होऊ शकणार नाही. त्यामुळे पाऊस कधी थांबतो हे पाहणे महत्वाचे असेल. पण त्याचवेळी पाऊस नेमका कधी सुरु होणार, याची माहिती समोर आली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामना कधी सुरु होऊ शकतो, हे देखील आता समोर आले आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून पाऊस हा एक ते दीड तास होऊ शकतो. त्यानंतर मैदानाची पाहणी करून हा सामना सुरु केला जाऊ शकतो. साधारण सामना हा संध्याकाळी ७.३० ला सुरु होतो. पण त्यापूर्वी हा पाऊस आणि सामन्याचा एक तास त्यामुळे वाया जाऊ शकतो. त्यामुळे या सामन्याचा टॉस हा .४७ च्या दरम्यान सुरु होऊ शकतो आणि सामना रात्री ८.०० वाजता सुरु होऊ शकतो, असे भाकीत वर्तवले जात आहे. हा सामना जर रात्री ९.४० च्या आधी सुरु झाला तर तो २० षटकांचा होणार, आयपीएलच्या नियमांमध्ये म्हटले गेले आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम फेरीचा सामना हा २० षटकांचा होऊ शकतो.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

आयपीएलच्या फायनलचा सामना हा चांगलाच रंगतदार होईल, अशी चाहत्यांना आशा आहे. त्यामुळे हा सामना जर २० षटकांचा होऊ शकला तर नक्कीच चाहत्यांना जास्त आनंद अनुभवता येऊ शकतो.

[ad_2]

Related posts