[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
झाशीला जातो सांगून बुधवारी सकाळी निलू घरातून बाहेर पडला. दुपारी दोनच्या सुमारास त्याला पत्नीनं फोन केला. मात्र त्याचा फोन बंद होता. संध्याकाळपर्यंत त्याच्याबद्दल काहीच समजलं नाही. त्यामुळे कुटुंबियांनी नातेवाईक, मित्रांना फोन करुन विचारपूस केली. मात्र निलूचा ठावठिकाणा सापडला नाही. गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र काहीच धागेदोरे सापडले नाहीत.
रात्री दहाच्या आसपास निलूची बुलेट तलावाच्या किनाऱ्यावर दिसली. बुलेटवर कपड्यांमध्ये गुंडाळलेला मोबाईल सापडला. तिथून १०० मीटर अंतरावर निलूची चप्पल आढळली. कुटुंबियांनी याची माहिती सिपरी बाजार पोलिसांना दिली. गुरुवारी सकाळी पाणबुड्यांनी तलावात उड्या घेत निलूचा शोध सुरू केला.
अर्ध्या तासानंतर निलूचा मृतदेह सापडला. निलूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक तलावाच्या काठावर जमले. ‘निलूनं काहीजणांकडून पैसे घेतले होते. त्यांच्याकडून तगादा सुरू असल्यानं निलूनं आत्महत्या केली असावी,’ अशी माहिती प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
निलूनं आत्महत्येआधी कुटुंबातील दोन सदस्यांना मेसेस पाठवले होते. त्यातील एक मेसेज वडिलांना पाठवला होता. मला माफ करा. माझ्या मुलीची काळजी घ्या, असा मजकूर मेसेजमध्ये होता. रात्री साडे अकरा वाजता हा मेसेज डिलिव्हर झाला. तर रात्री दहाच्या सुमारास मोबाईल आणि बुलेट तलावाजवळ सापडली होती. नेटवर्क नसल्यानं मेसेज उशिरा डिलिव्हर झाला असावा अशी शक्यता आहे.
निलूनं दुसरा मेसेज त्याच्या भावाला पाठवला. त्यात त्यानं काही जणांनी पैशांसाठी लावलेल्या तगाद्याता उल्लेख होता. ‘काही जणांना पैसे द्यायचे आहेत, काही जणांकडून येणं आहे. तगादा लावणारे घरी येतात. त्यामुळे कंटाळलो आहे,’ असा मेसेज निलूनं भावाला केला होता. सिपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलूवर ८ ते १० लाख रुपयांचं कर्ज होतं.
[ad_2]