Maharashtra News Live Updates 28th May 2023 today maharashtra marathi news breaking news live updates Niti ayog New Parliament Inauguration news national politics news maharashtra live updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये… 

निती आयोगाच्या बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, आठ राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला गैरहजर

नवी दिल्लीत (New Delhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची आठवी बैठक (NITI Aayog meeting) शनिवारी 27 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ‘विकसित भारत @2047: रोल ऑफ टीम इंडिया’ हा यंदाच्या बैठकीचा विषय आहे. परंतु या बैठकीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता या मुख्यमंत्र्यांना त्यांनी टाकलेला बहिष्कार हा महागात पडू शकतो असं सांगितलं जात आहे. 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडून निती आयोगाच्या बैठकीवर जो बहिष्कार टाकण्यात आला तो त्यांनी राज्याच्या विकासावर टाकला आहे असं म्हटलं जात आहे. तसेच या बैठकीत जवळपास 100 मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, त्यामुळे जी राज्यं या मुद्द्यांचं प्रतिनिधित्व करु शकणार नाहीत ती राज्य पराभवाच्या दिशेने वाटचाल करतील. 

ABP C Voter Survey:  पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेक्षणात समोर आला लोकांचा कौल

ABP C Voter Survey:  केंद्रात मोदी सरकारने (Modi Government) त्यांच्या नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या नऊ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा भाजपकडून (BJP) करण्यात आला तर विरोधकांकडून यावर चांगलीच टीका देखील करण्यात आली. आता एका वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता जाणार का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एका बाजूला विरोधी पक्षांकडून एकजूट निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तर भाजपाकडून केंद्रात सत्तेची हॅट्ट्रिक मारण्याची तयारी सुरु आहे.  

याच पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणामध्ये पंतप्रधान पदाच्या पसंतीचा सवाल करण्यात आला होता. पंतप्रधान पदासाठी भाजपचे नरेंद्र मोदी की काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी यापैकी कोणाला मतदान कराल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना 56 टक्के लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पसंती दर्शवली आहे. तर 35 टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर पाच टक्के लोकांनी कोणालाही पसंती दर्शवली नाही आहे. चार टक्के लोकांनी निश्चित सांगता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकानंतर देशात पुढील पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

[ad_2]

Related posts