Maharashtra Rain Updates Rains In Chhatrapati Sambhaji Nagar Farmers Gets Relief

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात आज पुन्हा हजेरी लावली आहे. आज संध्याकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस कोसळतोय. तर अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात देखील जोरदार पाऊस होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागात पिकं अक्षरशः करपून जात होती, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या होत्या. अशात आज झालेल्या पावसाने पिकांना जीवनदान मिळालं आहे. 

जिल्ह्यातील ‘या’ भागात पाऊस…

आज दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान संध्याकाळी सहा वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. पैठण, सिल्लोड, सोयगाव, तालुक्यातील अनेक भागात पाऊस कोसळतोय. अनेक ठिकाणी विजेचा कडकडाट पाहायला मिळतोय. आज संध्याकाळनंतर अंभई, शिवना, पिशोर, भराडी, सावळदबारा, गल्लेबोरगांव, सिल्लोड, पिंपळवाडी, बनकिन्होळा, वाळूज, चितेगाव, छावणी, विहामांडवा, बालानगर, घाटनांद्रा, दौलताबाद, खंडाळा, अजिंठा, भराडी, फर्दापुर, करंजखेड,आळंद, वैजापूरसह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे.

पिकांना जीवनदान मिळालं!

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा खंड पडला होता. अनेक भागात तर गेल्या वीस दिवसांपासून पावसाचा थेंब पडला नाही. त्यामुळे पीक अक्षरशः करपून जात होती. काही ठिकाणी तर पीक नष्ट झाली आहे. विशेष करून कापूस आणि सोयाबीन पिकाला याचा अधिक फटका बसला आहे. कापसाच्या पाता गळून पडत आहे. अशीच काही परिस्थिती सोयाबीनची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागलं होतं. मात्र, आज होत असलेल्या पावसाने या पिकांना जीवनदान दिला आहे. पण, असं असलं तरीही मागील काही दिवसात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

जोरदार पावसाची अपेक्षा!

राज्यातील 13 जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने हे जिल्हे रेड झोनमध्ये गेले आहेत. विशेष म्हणजे या 13 जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात सुद्धा फक्त 33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळ्याचे आणखी दहा ते बारा दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे या काळात जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

 इतर महत्त्वाच्या बातम्या : 

[ad_2]

Related posts