Nashik Latest News Seventeenth Day Of Dhangar Reservation Today, Meeting With Chief Minister Fruitless Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदनगर : जिल्ह्यातील चौंडीत सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर यशवंत सेनेच्या उपोषण आंदोलनाचा (Dhangar Aarskhan) आजचा 17 वा दिवस आहे. मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक देखील झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. आजही आंदोलन सुरुच असून दुपारी यशवंत सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात (ST) समावेश असून त्याची अंमलबजावणी करावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू असून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. सतरा दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने कालच यशवंत सेनेचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला (Mumbai) मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. काल मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक देखील झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. बैठकीतून तोडगा निघाला नसून आंदोलकांचे समाधान न झाल्याने हे उपोषण सुरूच राहणार आहे. दरम्यान या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी पाथर्डी (Pathrdi) तालुक्यातील मिरी येथे धनगर समाजाच्या वतीने उपोषण आंदोलन सुरू आहे. त्याचा देखील सातवा दिवस आहे तर पारनेर तालुक्यातील ढोकी फाटा येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात आला आहे. तर आज दुपारी यशवंत सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

चौंडीत उपोषणासाठी बसलेले सुरेश बंडगर (Suresh Bandgar) यांची प्रकृतीही खालावली आहे. आंदोलन सुरूच असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाला बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार काल यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत एक बैठक झाली खरी मात्र ही बैठक निष्पळ ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे कालच्या बैठकीत समाधान न झाल्यामुळे हे उपोषण सुरू राहील, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. त्यामुळे आजही आंदोलन सुरु असून आज दुपारी आंदोलनकर्त्यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. 

बैठकीतून काय समोर आलं? 

दरम्यान धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून राज्यभरात आंदोलने, उपोषणे सुरु आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी काल मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली. बैठकीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असलं तरी मात्र आंदोलकांचे समाधान काही झालेलं नाही जे मुख्य मुद्दे आहेत, त्यापेक्षा वेगळ्याच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे आंदोलकांचे म्हणणं आहे. सोबतच सरकारने वेळ मागितलेली आहे, असं देखील आंदोलकांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 17 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि आज देखील हे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. यातील उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची प्रकृती ही काहीशी खालावलेली आहे, काल त्यांना ऑक्सिजन देखील लावण्याची वेळ आलेली होती आणि डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा सल्ला देखील दिलेला होता, मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार देत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतलेली आहे. 

इतर महत्वाची बातम्या

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाचा सतरावा दिवस, आंदोलक उपोषणावर ठाम

[ad_2]

Related posts