Pune Ganeshotsav 2023 Chitale Bandhuwale Introduce Silver And Gold Modak For Ganpati Know Price And Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : लाडक्या बाप्पासाठी कोण कधी काय (Pune ganeshotsav 2023) करेल?, याचा काही नेम नाही. गणेशोत्सवादरम्यान घरात बाप्पाच्या प्रसादासाठी रेलचेल असते. मात्र यंदा पुणेकरांना चक्क सोन्याचा आणि चांदीच्या मोदकाचा प्रसाद लाडक्या बाप्पासाठी घेता येणार आहे, असं आम्ही सांगितलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र पुण्याचे प्रसिद्ध चितळे बंधु मिठाईवाले यांनी खास बाप्पासाठी यंदा सोन्या चांदीचा अर्क असलेले मोदक तयार केले आहेत आणि याच मोदकांची सध्या पुण्यात ठिकठिकाणी चर्चा होताना दिसत आहे. 

गणरायासाठी खास ‘सुवर्ण मोदक’

गणेशोत्सव आणि मोदक हे अगदी अतूट समीकरण आहे. गणरायाला अतिशय प्रिय असलेले मोदक या काळात खायला मिळत असल्याने खवय्यांसाठी तर ही पर्वणीच असते. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, मावा मोदक, आंबा मोदक यावर मोदक प्रेमींमध्ये चढाओढ रंगत असते. त्यात आता सोन्याच्या आणि चांदीच्या मोदकाची भर पडली आहे.

चितळे बंधू मिठाईवाले यांचे उकडीचे मोदक, नऊ वेगवेगळ्या चवींचे मोदक हे ग्राहकांमध्ये आजपर्यंत प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर यंदा चितळेंनी गणरायासाठी खास ‘सुवर्ण मोदक’ तयार केला आहे. त्याचबरोबर चंदेरी मोदकही उपलब्ध आहे. सोन्याचे आणि चांदीचे आवरण असणारा हा मोदक चितळेंच्या डेक्कन येथील शाखेत ऑर्डरनुसार तयार करुन दिला जात आहे. गणरायाच्या नैवेद्यासाठी आणलेला हा आगळावेगळा मोदक यंदा सर्व खवय्यांसाठी नक्कीच विशेष आकर्षण ठरणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र पसरलेला उत्साह, गजबजलेल्या बाजारपेठा असे अत्यंत सुखकारी आणि मांगल्यमयी वातावरण आहे. या वातावरणात बाप्पासाठीचे नैवेद्य हा खवय्यांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक असे मोदकांचे नानाविध प्रकार आपल्याला बाजारपेठात दिसतात. आता त्यात ‘सुवर्ण मोदक’ या अतिशय आकर्षक प्रकाराची भर पडली असून खवय्यांना तो नक्की आवडेल, असा विश्वास चितळे बंधू मिठाईवाले यांनी व्यक्त केला.

किंमत किती आहे?

पुण्यातील चितळे बंधू यांच्याकडे प्रथमच हा मोदक पाहिला मिळत आहे. सोन्याचं अर्क लावलेलं मोदक 3680 रुपये किलो आहेत तर चांदीचा अर्क लावलेला मोदक 1280 रुपये किलो आहेत. याचं बरोबर खवयाचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट, अंजीर, केशर बदाम, ब्लूबेरी, असे विविध प्रकारचे मोदक या ठिकाणी मिळत आहेत. तसेच दुकानात साधारण पणे 275 प्रकारची मिठाई ही मिळते.

इतर महत्वाची बातमी-

Pune Ganeshotsav 2023 : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे ‘दगडूशेठ’ गणपतीची आरतीच 300 हून अधिक जवान हजर

[ad_2]

Related posts