Pakistan Squad For World Cup 2023 Hasan Ali Replaces Naseem Shah In The Pakistan World Cup Squad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Squad ODI World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी वनडे विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघामध्ये हसन अली याचे कमबॅक झालेय. जवळपास दीड वर्षांनतर हसन अलीने पाकिस्तान संघात कमबॅक केले आहे.

दुखापतीमुळे नसीम शाह विश्वचषक स्पर्धेला मुकणार आहे. आशिया चषक स्पर्धेत नसीम शाह याला दुखापत झाली.  शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि सलमान आगा पाकिस्तान संघाचा भाग आहेत.  शादाब खान याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आले. पाकिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत नसीम शाहचा समावेश आहे. मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. शुक्रवारी पाकिस्तानने संघाची घोषणा केली. नसीम शाह याच्या अनुपस्थितीत संघाने हसन अली याच्यावर विश्वास दाखवला आहे. हसन अलीने जवळपास दीड वर्षाने संघात कमबॅक केलेय. जन २०२२ मध्ये हसन अली याने अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तान संघाबाहेरच आहे.  हसन अळी याने 60 वनडे सामन्यात 91 विकेट घेतल्या आहेत.  लिए हैं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हटके अंदाजात विश्वचषकात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली. पीसीबीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) खात्यावर व्हिडीओ पोस्ट करत संघाची घोषणा केली. 

कर्णधार बाबर आझमसह फखर जमान, इमाम-उल-हक आणि मोहम्मद रिझवान हे देखील संघात आहेत. इफ्तिखार अहमद आणि सलमान आगा यांच्यावरही निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे. युवा खेळाडू मोहम्मद हॅरीस आणि सौद शकील हे देखील संघात आहेत. आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. बाबारच्या नेतृत्वातील संघाला आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचता आले नाही. पण आता नव्या रणनीतीसह २०२३ च्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झालाय. फहीम अश्रफ याला संघात जागा मिळवता आली नाही.

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानचे शिलेदार –

फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन अली.

 



[ad_2]

Related posts