Baramati News Ganesh And Gauri Poojan At The Home Of Muslim Shaikh Family In Baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बारामती : जात, धर्म यांच्या चौकटी मोडत पुणे (Pune ganeshotsav 2023) जिल्ह्यातील बारामतीमधील एका मुस्लिम कुटुंबियांने त्यांच्या घरात गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. बारामतील शेख कुटुबियांकडे आठ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात होता. मात्र, यंदा त्यांच्या घरात त्यांनी ज्येष्ठा गौरींची स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांचं बारामती तालुक्यात चांगलंच कौतुक होताना दिसत आहे. 

देशात, राज्यात आणि महत्वाचं म्हणजे लहान मोठ्या गावांमध्ये जातीय तेढ वाढत असताना त्यांनी राखलेला हा सामाजिक सलोखा वाखणण्याजोगा आहे. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. गेल्या आठ वर्षापासून शेख कुटुंब गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून मोठ्या श्रद्धेने गणपतीची आराधना करत आहे. यावर्षी गणपती बाप्पाच्या जोडीला गौराई आणली आहे. यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच गौराई बसवल्या आहेत. शेख कुटुंबात सहा जण राहतात. सहाही जणांनी मनोभावे गौरी गणपतीची पुजा केली. जाती-धर्माच्या भिंती ओलाडून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेख कुटुंब हे सहा जणांच असून शिकंदर शहाबुद्दीन शेख, आलिमा सिकंदर शेख, कईम सिकंदर शेख आणि मोहम्मद सिकंदर शेख गुण्या गोविंदाने राहतात. 

या गौरीदेखील खास आहे. 25 वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्टी या गावात काम करत असताना त्यांच्या वडिलांना गौराईचे मुखवटे सापडले होते. त्यानंतर त्यांनी ते जपून ठेवले होते. मुस्लिम समाजात गौराई बसवल्या जात नाहीत. मात्र सगळ्यांचे देव सारखेच असतात आणि गणपती सगळ्यांचा देव आहे. रक्षण करणारा आहे. त्यामुळे गौरी गणपतीवरील निस्वार्थ श्रद्धा असल्याने यावर्षी पहिल्यांदाच शेख कुटुंबाने गौराई बसवल्या आहेत. 

शेख कुटुंबियांकडे माहेरवाशिण आल्या गौरी… 

खरंतर सध्या सगळीकडे जातीवरुन राजकारण होताना दिसत आहे. जात, धर्म, पंथ यांच्यातून वादावादी वाढताना दिसत आहे. त्यातच शेख कुटुंबियांनी गणपती आणि गौरींची स्थापना करुन सामाजिक सलोख्याचा आणि ऐक्याचा संदेश दिला आहे. आपण सर्व एक आहोत कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केल आहे. एकमेकांवर श्रद्धा ठेवा, माणसं म्हणून वागा माझी बाप्पावर श्रद्धा आहे मात्र यावर्षी आम्ही गौंरीचीदेखील पुजा करण्याचं ठरवलं असल्याचं शेख कुटुंबीय सांगतात.

इतर महत्वाची बातमी-

Pune News : सोनपावलांनी गौरी आल्या! बसलेल्या गौरी अन् जागरण गोंधळ देखाव्याची पुण्यात चर्चा

[ad_2]

Related posts