Lonavala Sky Walk Video Of Loanvala Tiger Point And Lions Point Sky Walk Sunul Shelke

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात निसर्गाचा आनंद घेतानाच तुम्हाला थरार (sky walk) अनुभवायला मिळणार आहे. दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा आणि हवेतून झेपावण्याचा आनंद ही लवकरच घेता येणार आहे. राज्य सरकारने या पर्यटन स्थळी ग्लास स्काय उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळं भविष्यात लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर पॉइंटचं रुपडं अक्षरशः पालटून जाणार आहे. याच प्रकल्पाचा प्राथमिक व्हिडीओ समोर आला आहे. दोन हजार फूट खोल दरीवर स्काय वॉक उभारून हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडले जाणार आहेत. यानिमित्ताने दरीवरून चालण्याचा अन झिप लाईनद्वारे हवेतून झेपावण्याचा थरार पर्यटकांना अनुभवता येणार आहे. सोबतच लहानग्यांसाठी विविध खेळ, अँपी थिएटर, फूड पार्क, खुले जिम अन प्रशस्त पार्किंगची सोय केली जाणार आहे. बारा एकर क्षेत्रावर शंभर कोटी खर्चून राज्य सरकार हे दोन्ही पॉईंट विकसित करणार आहे.

स्काय वॉक कसा असेल? व्हिडिओ आला समोर 

याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या स्काय वॉकची रचना कशी आहे, याचं स्वरुप या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. पर्यटकांना या स्काय वॉकच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टींचा अनुभव घेता येणार आहे. हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीनं नियोजन करण्यात यावे, असं अजित पवारांनी सूचित केलं.

या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्यानं आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावं. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसंच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशा सूचना केल्या.

याबरोबरच मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याबाबत चर्चा झाली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतरावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथं जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक माहिती संकलित करावी, अशी सूचना केली.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : आई-वडिल गावी गेले, ध्रुव फिरण्यासाठी रात्री एक वाजता बाहेर पडला अन् परतलाच नाही, नेमकं काय घडलं?

[ad_2]

Related posts