Samudrik Shastra : मुलीच्या डोळ्यात दडलंय भविष्य; लग्नासाठी मुलगी शोधताना कायम लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samudrik Shastra : सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराची रचना आणि विशेष चिन्हांद्वारे तुमचं व्यक्तिमत्व आणि भविष्याचा उलगडा होतो. ज्योतिषशास्त्र, कुंडलीतील ग्रह ताऱ्यावरुन लग्नासाठी मुला मुलीची लग्नाची गाठ बांधली जाते. आजही आपल्याकडे अरेंज मॅरेज केले जातात. त्यामुळे अशावेळी तुमच्या मुलासाठी आणि घरासाठी कुठली मुलगी भाग्यशाली आहे. (Samudrik Shastra girl with such eyes is lucky her in laws house and woman personality know her nature before marriage)

सामुद्रिक शास्त्रानुसार मुलीच्या डोळ्यांवरून सासरच्या मंडळींचं भविष्याचं गणित उलगडू शकतं. कधी कधी लग्नानंतर काही लोकांचं निद्रिस्त नशीब जाग होतं. लग्नानंतर सूनेच्या घरातील प्रवेशाने अनेक घराचं नशिब पालटतं. 

डोळे 

डोळ्यांमुळे मुलींच्या सौंदर्यात भर पडते. या डोळ्यांवर अनेक कविता आणि गाणी आपण ऐकली आहेत. लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी जाणार असाल तर त्या मुलीच्या डोळ्यांवरुन भविष्य जाणून घ्या. ज्या मुलींचे डोळे हरणासारखे सुंदर आणि मोठं असतात, त्या नवऱ्यासाठी नशिबवान असते. ज्या तरुणीचे डोळे काळे, मोठे आणि पापण्या लहान असतात त्या तरुणी भाग्यशाली मानल्या जातात. 

तळव्यावर खूण

जर तरुणीच्या तळव्यावर त्रिकोण असेल ती तरुणी खूप बुद्धिमान असते, असं शास्त्र सांगत. या मुली विचारपूर्वक निर्णय घेऊन कुटुंब कायम एकत्र ठेवतं. ज्या तरुणीच्या तळव्यावर शंख, कमळ किंवा चक३ असतं त्या धनलक्ष्मी मानल्या जातात. ज्या तरुणींचे पाय गुलाबी, चमकदार आणि अतिशय माऊ असले त्या कुटुंबासाठी सौभाग्यशाली असतात. 

चामखीळ/तीळ

जर तरुणीच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ किंवा चामखीळ असेल तर या तरुणी खूप शुभ असतात. ज्या मुलीच्या डाव्या गालावर तीळ असेल तर ती तरुणी खवय्या असते. अशा तरुणी पोटाच्या मार्गे कुटुंबातील सदस्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts