अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही उपस्थित 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amit Shah : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) हे मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सपत्निक लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. यावेळी शाह यांच्या दौऱ्यामुळं लालबागमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज दुपारी दोन वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. मुंबईत दाखल झाल्यावर शाह यांनी सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यानंतर अमित शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतील. त्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुंबई विद्यापाठीत एका कार्यक्रमात अमित शाह हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होणार आहेत. 

राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून सत्तेत शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्यावर्षी अमित शाह पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. 

 

[ad_2]

Related posts