Nashik Latest News Suicide Of Farmer In Devla Taluka Of Nashik District Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस (Nashik Rain) झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक भागात नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी (Farmers) हवालदील झाले असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याच निराशेतून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने टोकाचा निर्णय स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील देवळा (Deola) तालुक्यात एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. प्रताप बापू जाधव असे 36 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे फारसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे ते नैराश्यात गेले होते. तर दुसरीकडे इतरांकडून उसणवारीने घेतलेल्या पीक कर्जाचा (Crop Loan) डोंगरही वाढत चालला होता. याच विवंचनेतून जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. घराजवळच्या विहिरीत स्वतःला झोकून जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान सततची नापिकी आणि या वर्षी पावसाने ओढ दिल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने घराजवळच्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना देवळा तालुक्यातील सातवाईवाडी येथे घडली. आज सकाळच्या सुमारास ते घराबाहेर पडले असता, परत आलेच नाही. यानंतर कुटुंबियांनी सर्वत्र शाेध घेतला. परंतु, त्यांचा काही तपास लागला नाही. अशातच घराजवळील काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दिड एकर शेती आहे. कांदा लागवड (Onion Crop) करून त्याच्यासाठी मोठा खर्च केला, मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाला, तर साठवलेला कांदा खराब झाल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा, या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी मारत आपले जीवन संपविले. 

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक 

दरम्यान मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक असून यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून तब्बल 93 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. तर जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे 40 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं. तर जुलै महिन्यात  21 तर जून महिन्यात 32 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे या आत्महत्येचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीमध्ये एकूण 189 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Nana Patekar : ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील, त्या दिवशी महाराष्ट्र एक नंबर होईल : नाना पाटेकर  

[ad_2]

Related posts