Maharashtra Rain  Heavy Rain Will Occur In Some Parts Of The State In The Next Three To Four Hours 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Rain : हवामान विभागानं (Imd) राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन तासात छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव, जळगाव, नाशिक, नंदुरबार, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  तसेच  मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी

पुढील तीन ते चार तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. या पावसामुळं दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच रहदारी कमी होईल. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. 

[ad_2]

Related posts