Ajit Pawar On Ujjani Dam And Maharashtra Rain For Agriculture Ganeshosthav Update News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे, बारामती: राज्यात यंदा झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वजणच चिंतेत आहेत. राज्यातील प्रमुख धरणंही यंदा भरली नाहीत, त्यामध्ये पुरेसा पाणी साठाही साचला नाही. त्यामुळे अजित पवारांनी (Ajit Pawar) देवाला साकडं घातलं आहे. राज्यात भरपूर पाऊस पडू दे सर्वांना सुख समृद्धी लाभू दे असं म्हटलं. तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, उजनीत ढगफुटीसारखा पाऊस पडू दे, पण फक्त शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांनी विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर बारामतीतील गणेश मंडळांना भेटी सुरू आहेत. त्यादरम्यान त्यांनी राज्यात भरपूर पाऊस पडू दे सर्वांना सुख समृद्धी लाभू दे, शेतकरी समाधानी होऊ दे असं साकडं गणरायकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातलं. 

उजनी धरण फक्त 25 टक्के भरलं आहे. उजनीत ढगफुटी सारखा पाऊस पडला पाहिजे, फक्त कुठं नुकसान होऊ नये असं साकडे अजित पवारांनी घातलं आहे. 

[ad_2]

Related posts