Agriculture News Fertiliser And Labour Cost Is The Biggest Challenge For Indian Farmer Claims Survey See Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Fertiliser and Labour Cost Hike : देशातील अनेक राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या (Farmers) अडचणी वाढल्या आहेत. काही राज्यात मात्र, चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना सातत्यानं विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. मजुरीचा वाढता खर्च आणि महागडी खते या दोन कारणामुळं देशातील 55 टक्के शेतकरी हैराण झाले आहेत. अलीकडच्या उत्पादनातही मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या जर्मनीच्या बायर क्रॉप सायन्स या कंपनीने याबाबतचा सर्वे केला आहे.  

दिवसेंदिवस शेतीचा उत्पादन खर्च वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. काही वेळेला तर उत्पादनाचा खर्चही निघत नाही. वाढते खतांचे दर, दुसरीकडे वाढत जाणारी मजुरी यामुळं देशातील शेतकरी चिंतेत असल्याचे सर्वेतून समोर आलं आहे. त्यामुळं गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शेतकऱ्यांना शेती करणंही कठीण झालं आहे. 

जर्मन कंपनीने नेमकं काय सर्वेक्षण केलं

जर्मन कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात 47 टक्के शेतकऱ्यांनी मान्य केले की, महागड्या वीजेमुळं शेती करणं कठीण झाले आहे. तर 37 टक्के शेतकर्‍यांनी अस्थिर झालेलं उत्पन्न आणि 36 टक्के शेतकर्‍यांनी पीक सुरक्षा हे मोठं आव्हान असल्याचे सांगितले आहे. जर्मनीची कृषी आधारित कंपनी बायर क्रॉप सायन्सने या सर्वेक्षणात देशभरातील 2 हजार 56 शेतकऱ्यांशी संवाद साधला. यासोबतच या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 42 टक्के शेतकऱ्यांनी कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळं यंदा पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली आहे.

डिजिटल तंत्रज्ञान शेतकरी उपयुक्त

बायर क्रॉप सायन्सने सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, 60 टक्के शेतकऱ्यांनी मान्य केले आहे की भारतात डिजिटल तंत्रज्ञान वाढल्यानं शेती करणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, भारतात वाढत्या डिजिटलायझेशनमुळं पीक सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे. यासोबतच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 10 पैकी 8 शेतकरी त्यांच्या शेतीशी संबंधित भविष्याबाबत सकारात्मक आहेत.

गेल्या दोन वर्षांत उत्पन्नात मोठी घट

सर्वेक्षणा दरम्यान शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत उत्पन्नात मोठी घट झाल्याचे मान्य केले आहे. दर सहापैकी एका शेतकऱ्याने गेल्या दोन वर्षांत त्यांचे उत्पन्न 25 टक्क्यांहून अधिक घटल्याचे मान्य केले आहे. यासोबतच एकूण 76 टक्के शेतकरी हवामान बदलाला भविष्यातील मोठा धोका मानतात. दरम्यान, बायर क्रॉप सायन्सने भारताव्यतिरिक्त चीन, जर्मनी, केनिया, युक्रेन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामधील लहान शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Fertiliser : खते महागणार? बळीराजाचा खर्च वाढणार; रशियाकडून सवलतीच्या दरात खत देणं बंद

[ad_2]

Related posts