Amit Shaha Mumbai Visit Lok Sabha Electon Bjp Mission 45 Plus Pune Jalgaon Navi Mumbai Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election : राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे का आणि भाजपच्या मिशन 45 प्लससाठी महायुतीचा मास्टर प्लॅन काय आहे याचा आढावा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी घेतला. केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज मुंबईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत पुणे, जळगाव आणि दक्षिण मुंबई या तीन जागेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

राज्यातील राजकीय स्थितीचा आज अमित शाह यांनी आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यामध्ये राज्यातील मतदारांचा राजकीय कौल काय आहे हेदेखील जाणून घेतलं. 

Pune Lok Sabha Election : तीन वादग्रस्त जागांवर चर्चा 

अमित शाह यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीत पुणे, जळगाव आणि दक्षिण मुंबई या तीन वादग्रस्त जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे लोकसभेची जागा ही भाजपकडे असून त्या ठिकाणचे खासदार गिरीश बापट यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे. त्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार अशी चर्चा होती, पण ती झाली नाही. आता या ठिकाणची निवडणूक ही लोकसभेसोबतच होणार असल्याचं स्पष्ट आहे. 

पुण्यामध्ये लोकसभेची उमेदवारी कुणाला द्यायची यावरून वाद आहे. उमेदवारी बापट यांच्या घरातील व्यक्तीला द्यायची की इतर कोणत्या भाजपच्या नेत्याला द्यायची याची स्पष्टता नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. ही जागा भाजपची पारंपरिक जागा. त्या ठिकाणी टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मण नेत्याला उमेदवारी न दिल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारांनी आपली नाराजी दाखवल्याची चर्चा होती. त्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेच्या जागेसाठी होऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. पुण्यातील जागेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुण्याचे शहरप्रमुख यांच्यासह काहीजण उत्सुक असल्याची चर्चा आहे. 

Jalgaon Lok Sabha Election : जळगावचा वाद काय?

दुसरीकडे जळगावच्या जागेवरून काहीशी स्पष्टता नाही. या ठिकाणच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे या जागेवर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास गिरीश महाजन आणि इतर नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खेडसे स्वतः निवडणूक लढू शकतात, तसे संकेतही त्यांनी दिले आहेत. मग त्या ठिकाणी कुणाल उमेदवारी द्यायची हा प्रश्न सध्या भाजपसमोर आहे. 

South Mumbai Lok Sabha Election :  मुंबईत शिवसेनेचा दावा

दक्षिण मुंबई ही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठेची जागा असल्याचं सांगितलं जातंय. सध्या या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. गेल्या निवडणुकीवेळी ही जागा भाजपने मागितली होती. या मतदारसंघात उद्योजक आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती राहायला आहेत. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा सांगितला जातोय. गेल्या निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी अरविंद सावंत यांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. अरविंद सावंत हे कमी मतांच्या फरकाने विजयी झाले. 

आता ही जागा भाजपला हवी आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा केला आहे. पण भाजपने आता कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणचा खासदार हा आपलाच असावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts