[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Eknath Shinde : भाषण थांबवलं.. शिवरायांसमोर नतमस्तक, अन् म्हणाले Maratha Reservation देणारच
मुंबई: मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली. मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही वाट्याचं काढून घेणार नाही, मराठा समाजाला न्याय देणार असं सांगत एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण देताना सर्वच समाज घटकाला न्याय कसं मिळेल हे पाहिलं जाईल, मराठा समाजाला निश्चितच आरक्षण दिलं जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले.
[ad_2]