Maharashtra News Sharad Pawar Group Aggressive Against Ajit Pawar Group MLAs In Nagaland Demand For Action Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आक्रमक झाले आहेत.  एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना आता नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेती आहे. महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची  मागणी शरद पवार गटाने केली आहे. आमदार कारवाईबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. नागालँडमधील सातही आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे. नागालँडमधील आमदार तीन दिवसीय दौऱ्यात मंगळवारी अजित पवारांची भेट घेणार आहेत. नागालँडचे आमदार मुंबई दौऱ्यावर असताना आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. नागालँडचे विधानसभा अध्यक्ष यांना शरद पवार गटाने काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. या पत्रात सत्तेत सहभागी सात आमदारांनी अजित पवार गटासोबत जाऊन पक्षविरोधी कृती केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज आमदारांच्या कायदेशीरबाबीसंदर्भात बैठक

विधानसभा अध्यक्ष यांना पत्र दिल्यानंतर नागालँडचे आमदार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज आमदारांच्या कायदेशीरबाबीसंदर्भात बैठक देखील पार पडणार आहे.  संध्याकाळी पाच वाजता अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची आमदारांसमवेत एमसीए लॉन येथे महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. 

मंगळवारी घेणार अजित पवारांची भेट 

 नागालँडमधील सातही आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. नागालँडचे प्रदेशाध्यक्ष एस तोईहो येपथो (S Toiho Yeptho) म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँडचे आमदार पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. निवडून आल्यावर हा पहिलाच मुंबई दौरा आहे.  तीन दिवसीय दौऱ्यात मंगळवारी घेणार अजित पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवारांची भेट होण्याची शक्यता कमी आहे. या दौऱ्यात  आगामी लोकसभा निवडणुकीसह इतरही मुद्द्यांवर करणार चर्चा करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा :             

 

[ad_2]

Related posts