Pm Modi To Visit Bhopal In Birth Anniversary Program Of Pandit Deendayal Upadhyaya Shivraj Chouhan Will Be There

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज, 25 सप्टेंबर रोजी भोपाळ दौऱ्यावर (Bhopal Visit) आहेत. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या भोपाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंडित दीनद्याल उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyaya) यांच्या जयंती निमित्त भोपाळमध्ये भव्य कार्यक्रमाचं ((PM Narendra Modi Program) आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने जंबुरी मैदान (Jamboree Maidan) येथे पंतप्रधान मोदी 10 लाख भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांचा भोपाळ दौरा

पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशात येणार असल्याने राज्य शासनाकडून जंगी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदींच्या भोपाळ दौऱ्याच्या तयारीची पाहणी केली. पंतप्रधान मोदी विशेष विमानाने 10 वाजून 55 मिनिटांनी भोपाळ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळासाठी रवाना होतील. पंतप्रधान मोदी 11 वाजून 20 जंबूरी मैदान या कार्यक्रमस्थळी पोहोचतील. त्यानंतर सभेला संबोधित करतील. कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने पुन्हा विमानतळावर दाखल होतील आणि तेथून जयपूरसाठी रवाना होतील.  

पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम कसा असेल?

पंडित दीनद्याल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भोपाळमधील जंबुरी मैदान येथे महाकुंभ (Pandit Deendayal Upadhyaya Birth Anniversary) आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता भोपाळमध्ये दाखल होतील आणि महाकुंभसाठी उपस्थित लाखो भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील. नारी शक्ती वंदन कायद्यासाठी नारी शक्तीकडून पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधान मोदी एक दिवसीय भोपाळ दौरा संपवून परततील.

मध्य प्रदेश आणि भोपाळ सज्ज पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी मध्य प्रदेश आणि भोपाळ सज्ज असल्याचं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेलिपॅडची पाहण केली. तसेच, सभास्थळ जंबुरी मैदान येथील बैठक व्यवस्था, मंच तसेच इतर सुरक्षा व्यवस्था यांची पाहणी केली. दौऱ्याची सर्व तयारी झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

प्रशासनाकडून तयारी पूर्ण

मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास कैलाश सारंग, खासदार व्ही.डी.शर्मा, लोकप्रतिनिधी आणि भोपाळचे आयुक्त डॉ.पवन शर्मा आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या भोपाळमध्ये दौऱ्यासाठी प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेतही बदल केला आहे. तसेच, हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

[ad_2]

Related posts