[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रो (ISRO) आता आगामी चंद्रमोहिमेसाठी (ISRO Moon Mission) सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) अर्थात इस्रो आता पुढील चंद्रमोहिमेत चंद्राचे (Moon) नमुने पृथ्वीवर (Earth) आणण्याचा प्रयत्नात आहे. इस्रोच्या पुढच्या चंद्रमोहिमेचं (Moon Mission) नाव लुपेक्स मिशन (LUPEX Mission) अशून यालाच चांद्रयान-4 (Chandrayaan-4) असंही म्हटलं जात आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने केलेली यशस्वी होपिंग चाचणी यासाठीच एक महत्वाचं पाऊल आहे.
इस्रो चांद्रयान-4 मोहिमेसाठी सज्ज
इस्त्रोची आगामी चंद्रमोहिम ही भारत आणि जपान यांची संयुक्त चंद्र मोहिम असेल. या लुपेक्स म्हणजेच चांद्रयान-4 मोहिमेसाठी चांद्रयान-3 कडून मोठी मदत झाली आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने 3 सप्टेंबर रोजी होपिंग टेस्ट केली. यावेळी लँडरने पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिग केलं. ही होपिंग चाचणी पुढील चंद्र मोहिमेचं पहिलं पाऊल असल्याचं सांगितलं जातं आहे.
इस्रोच्या चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणणार
चांद्रयान-3 च्या विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरलं. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी होपिंग चाचणी केली. यामध्ये विक्रम चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 ते 40 सेमी उंचीवर गेलं. त्यानंतर विक्रम लँडरने पुन्हा सुरक्षितरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. ही चाचणी इस्रोच्या आगामी लुपेक्स मोहिमेचं एक छोटं प्रात्यक्षिक होतं. भारत आणि जपानच्या संयुक्त आगामी चंद्रमोहिमेकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे.
“चांद्रयान-3 कडून मिळालेली माहिती, विशेषत: यशस्वी हॉप प्रयोग, भविष्यातील चंद्र मोहिमांचा आधार ठरणार आहेत”, असे एका अधिकाऱ्याने टाईम्सला माहिती सांगितलं आहे. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, “चंद्रावरील प्रयोगांच्या आधारे इस्रो आगामी मोहिमा आखेल, ज्यामध्ये चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणता येतील. ही मोहिम कधी पूर्ण होईल, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही, पण या मोहिमेसाठी खास प्रणाली विकसित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.” हॉपचा प्रयोग मोठ्या योजनेचं फक्त एक छोटं प्रात्यक्षिक होतं, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chandrayaan-3 : आता इस्रोच्या चांद्रयान-4 चा ध्यास! चंद्राचे नमुने पृथ्वीवर आणण्याची मोहिम
[ad_2]