vs-aus-ravichandran-ashwin-most-international-wickets-for-india-against-australia | आर. अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक विकेट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Australia Ravichandran Ashwin Record : इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी पराभव केला. फलंदाजांनी आधी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चोपले त्यानंतर गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखले. फलंदाजीत श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार कामगिरी केली. तर गोलंदाजी अश्विन आणि जाडेजा यांनी भेदक मारा केला.  रविचंद्रन अश्विन यीने 7 षटकात 41 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट घेतल्या. या सामन्यात अश्विन याने खास विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक विकेट घेणारा भारताय गोलंदाज झालाय. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. 

अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.  मात्र अश्विनने आता त्याला मागे सोडले आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 144 विकेट घेतल्या आहेत. तर कुंबळेने 142 विकेट घेतल्या आहेत. कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांचाही समावेश आहे. कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 141 विकेट घेतल्या आहेत. कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध 135 विकेट घेतल्या आहेत.

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय 

 दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99  धावांनी विजय मिळवला.  भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला ३१७ धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. या विजयासह तीन सामन्याची मालिका भारताने २-० ने जिंकली आहे. मोहाली आणि इंदौर वनडे सामन्यात भारताने बाजी मारली. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.



[ad_2]

Related posts