Indian Cricket Team Can Win Odi World Cup 2023 These Two Stats Are Raising Hopes For Fans

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक संघ रनसंग्रामाची तयारी करत आहे. माजी खेळाडू कोण विश्वचषक जिंकणार याचे भाकीत करत आहे. सोशल मीडियावरही याचीच चर्चा सुरु आहे. पाच ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषक विजयासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्याशिवाय आणखी एक योगायोग जुळून आला आहे. भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरणार? असेच सर्वजण म्हणत आहे. 

भारतीय संघ वनडेत अव्वल – 

आशिया चषक जिंकल्यानंतर टीम इंडियाने मायदेशात ऑस्ट्रेलियालाही चारीमुंड्या चीत केले. त्याचा फायदा आयससी क्रमवारीत झाला. वनडे क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. वनडे, टी२० आणि कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकवर आहे. वनडेमध्ये पहिल्या स्थानावर असेलला भारतीय संघा विश्वचषकात उतरणार आहे. 

योगायोग काय आला जुळून ?

वर्ल्डकपचे यजमानपद असण्यासोबतच तो संघ त्यावेळी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. त्या संघांनी २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकावर नाव कोरलेय. सध्या भारत हा आयसीसीच्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. टीम इंडिया केवळ वनडेच नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन आहे. 2015 विश्वचषक ऑस्ट्रेलियात झाला होता,  ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून पाचवे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा वनडे संघही नंबर वन होता. 

त्यानंतर, 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. विशेष म्हणजे, विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये झाले होते.  त्याशिवाय विश्वचषक जिंकणारा इंग्लंड संघ त्यावेळी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा संघ होता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. 

यजमान अन् अव्वल क्रमांकावर टीम इंडिया – 

यंदाचा एकदिवसीय विश्वचषक भारतामध्ये होत आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मागील दोन्ही विश्वचषकाचा इतिहास पाहिल्यास योगायोग भारताच्या बाजूने आहे. टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार का?  हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  भारताने 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात अखेरची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. यंदा रोहित शर्मा विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. 



[ad_2]

Related posts