Supriya Sule Vs Sunetra Pawar Contents From Baramati Baramati Lok Sabha Pune News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे:  पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार अस समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पण मुलांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढवू पाहणाऱ्या सुनेत्रा पवार खरंच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढतील का असा सवाल उपस्थित झाला आहे. .

सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सुनबाई. पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. परंतु याच सुनेत्रा पवार आता नणंद असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचे पुत्र पार्थ पवार लढणार अशी चर्चा सुरू होती. पण अचानक सुनेत्रा पवारांची चर्चा सुरू झाल्याने राजकिय चर्चांना उधाण आले. 

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, खडकवासला, भोर- वेल्हा हे विधानसभा मतदारसंघ येतात. खडकवासला आणि दौंड मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. राष्ट्रवादीचं अजित पवार आणि दत्तात्रय भरणे , काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर असे आमदार आहेत. अजित पवारांच्या बंडामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत.

पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळे निवडून आले आहे. पण पुरंदर तालुक्यातील काही जण सोडले तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूला आहे. भाजपचे राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता

आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्याआधी त्या महिला सक्षमीकरण, सबलीकरण, आदिवासीचा शैक्षणिक व सामाजिक विकास, तसेच पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करण्यात सक्रिय होत्या. तसेच यशवंतराव चव्हाण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे आजही करत आहेत. या कामामुळे त्याच्या लोकांशी थेट संपर्क आला. त्यांनतर त्या राज्यसभेत निवडून गेल्या. त्यांनतर त्या सलग तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. तिसऱ्या टर्म मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट दिली आहे..

तर सुनेत्रा पवार या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला, ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात सिनेट सदस्य, सुनेत्रा पवारांचा पुणे जिल्ह्यात विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे. 

सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या शिक्षण क्षेत्रात काम करतात. विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून त्या शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्वागत केलं आहे. पण खरंच सुनेत्रा पवार राजकारणात सक्रि होतील का सवाल विचारला जातोय त्याचे कारण आहे. सुनेत्रा पवारांची दोन मुले आहेत. पार्थ आणि जय. पार्थ पवार हे आधीपासूनच राजकारनात सक्रिय आहेत. अजित पवारांच्या बंडानंतर जय पवार देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मुलांना राजकारणात सक्रिय करू पाहणाऱ्या सुनेत्रा पवार खरंच बारामतीतून निवडणूक लढतील का असा प्रश्नच आहे. 

भाजपाला बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे, कांचन कुल, हर्षवर्धन पाटील, पार्थ पवार यंच्या नावाची चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवारांचे नाव आले. पण  सुनेत्रा पवार या भाजपकडून लढतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.  तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हे शरद पवार निश्चित करतील असे सांगितल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. अजित पवारांनी उमेदवारी घोषित करण्याआधीच सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चा ना उधाण आलय.पण सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार असणार? की आणखी कोणी? हे लवकरच स्पष्ट होईल..

हे ही वाचा :

AJit pawar and Sunetra Pawar : अजित पवार म्हणाले, लवकरच माझी पत्नी सुनेत्रा सुद्धा…..

 

[ad_2]

Related posts