Pakistan Captain Babar Azam Slapped With Fine By Lahore Traffic Police

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

pakistan captain Babar Azam : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी (Wprld Cup 2023) पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वातील पाकिस्तान संघ बुधवारी भारतात (india) येण्यासाठी रवाना होणार आहे. पण त्यापूर्वीच पाकिस्तानच्या कर्णधाराला (pakistan captain) आर्थिक दंडाला सामोरं जावे लागलेय. ऑडी (Audi) गाडी चालवताना आठवडाभरात दोन वेळा नियम तोडल्यामुळे बाबर आझम याला लाहोर वाहतूक पोलिसांनी (Lahore traffic police) दंड ठोठावला आहे. बाबार आझम याने वाहतूकीचे नियम तोड मोडलेच, शिवाय त्याच्याकडे लायसन्सही नव्हते. त्यामुळे त्याला पोलिसांनी धारेवर धरले. अखेर बाबरला चालान भरावे लागलेय. बाबर आझमचा पोलिसांसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

 पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला दुसऱ्यांदा पोलिसांनी पकडला आहे. 2023 च्या विश्वचषकासाठी भारतात येण्यापूर्वी बाबरला त्याच्या कारचे चालान रद्द करावे लागले.   बाबरचा पोलीस कर्मचाऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, बाबर आझमने आपल्या पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारमधून हायवेवर जात होता. त्यावेळी त्याने वाहतूकीचे नियम मोडले. त्याने चुकीच्या लेनमधून गाडी चालवली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याच्याकडे लायसन्सही नसल्याचे समोर आले. लाहोर वाहतूक पोलिसांनी बाबर आझम याला झाड झाड झाडले. त्यानंतर त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.  सोशल मीडियावर बाबर आझम आणि पोलिसाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबर त्याची ऑडी कार आणि एका पोलिसासह दिसत आहे. 

 

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळाला –

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय व्हिसा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) याबाबतची माहिती दिली.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) टीमला  हैदराबादला जाण्यास उशीर होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली. त्यानंतर काही तासांतच आयसीसीने व्हिसा जारी केल्याची माहिती दिली.

पाकिस्तानचा संघ उद्या, 27 सप्टेंबर रोजी भारतासाठी रवाना होणार आहे. पाकिस्तान संघाच्या नियोजित प्रवासापूर्वी ४८ तास आधीच  व्हिसा मिळाला आहे.  पाकिस्तान संघ 29 सप्टेंबरला हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर ६ ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ –

बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शादाब खान (उप-कर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, हॅरिस रौफ.



[ad_2]

Related posts