World Cup 2023 Punes Gahunje Stadium To Host World Cup Cricket Matches After 27 Years Know All Details Time Table India Vs Bangladesh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पाच ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेट (Pune news)  विश्वचषकाला सुरुवात होत आहे. (Mens Cricket World Cup 2023) या विश्वचषकातील पाच सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्याचा समावेश आहे. तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. या निमित्ताने क्रिकेट विश्‍वचषक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आज पुण्यात आणण्यात येणार आहे आणि या विश्‍वचषकाची मिरवणूक निघाली आहे. 

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार (ajit pawar) आणि महाराष्ट्रातील आजी-माजी क्रिकेटपटू उपस्थित असणार आहेत. ही मिरवणूक 26 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरुवात झाली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरुन या मिरवणुकीला सुरुवात झाली असून कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही मिरवणूक पोहोचणार आहे. त्यानंतर या मैदानावर संध्याकाळी चार ते सहा या कालावधीत ही ट्रॉफी लोकांना फोटो काढण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

क्रिकेटप्रेमींना ट्रॉफीसोबत फोटो काढता येणार

तीन तास चालणाऱ्या या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील विद्यमान आणि माजी भारतीय खेळाडू, रणजी खेळाडू आणि एमसीएचे बाकी सदस्य सहभागी झाले आहेत. एमसीए अध्यक्षांनी विविध सायकलस्वार गट, मोटरसायकल रायडर्स गट आणि मॅरेथॉन धावपटूंना रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आम्ही पारंपारिक महाराष्ट्रीय पद्धतीने वर्ल्ड कप ट्रॉफीचे स्वागत करु. ट्रॉफीचे स्वागत करण्यासाठी ढोल-ताशा पथक असतील, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यंदा पुण्यातील क्रिकेटप्रेमींना या ट्रॉफीसोबत फोटो काढता येणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे. 

27 वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने 

ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील स्टेडिअवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. या स्टेडियमवर पाच सामने होणार आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार असल्याने पुण्यातील क्रिकेटप्रेमी उत्सुक दिसत आहेत. 

गहुंजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर कधी आणि किती सामने?

19 ऑक्टोबर – भारत vs बांगलादेश
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान vs Qualifier 2
1 नोव्हेंबर – न्यूझीलंड vs दक्षिण आफ्रिका
8 नोव्हेंबर – इंग्लंड vs Qualifier 1
12 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया vs बांगलादेश (Day Game)

आणखी वाचा : 

Team India World Cup Schedule : भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

[ad_2]

Related posts