Pune Rain Update Heavy Rain Lashes Pune Shivajinagar Records 26 Mm Downpour In An Hr

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्याच्या अनेक परिसरात मंगळवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी (Pune Weather Update) मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह 26 मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शिवाय गणपती मंडपात देखील भाविकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. शिवाजीनगर, पेठ परिसर, डेक्कन, कोथरुड, कर्वेनगर, विश्रांतवाडी, कात्रज, बाणेर, पाषाण, कोंढवा, सिंहगड रोड, लोहेगाव, हडपसर यासह विविध भागात मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला.

मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांवर गर्दी करणाऱ्या अनेक भाविकांची अचानक आलेल्या पावसाने प्रचंड गैरसोय झाली. दगडूशेठ गणपती, बाबू गेनू गणपती आणि मंडई परिसरात दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हवामान खात्याने काय सांगितलं?

IMD पुणेचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, “मंगळवार संध्याकाळी पुणे शहरावर मोठ्या प्रमाणात ढग निर्माण झाले होते आणि त्याचा परिणाम म्हणून शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या 72 तासांत मान्सून सक्रिय राहील. दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आम्ही लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.”

कोणत्या भागात किती पाऊस झाला?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमध्ये गेल्या 24 तासांत 55 मिमी, तर तळेगावमध्ये 50.55 मिमी, पाषाणमध्ये 43 मिमी, शिवाजीनगरमध्ये 37.9 मिमी, लवळेमध्ये 37 मिमी, दापोडीमध्ये 37 मिमी, एनडीएमध्ये 36.5 मिमी, बीएचआरमध्ये 36.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 5 मिमी, कोरेगाव पार्क 29 मिमी, राजगुरुनगर 23 मिमी, मगरपट्टा 22 मिमी, हडपसर 20 मिमी पाऊस झाला.

पावसामुळे झाडपडीच्या घटना…

मुसळधार पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आणि झाड पडण्याच्या घटना घडल्या ज्यामुळे काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला (पीएमसी) वडगाव शेरी, येरवडा, औंध आणि बिबवेवाडी येथून झाड पडण्याच्या घटनांशी संबंधित चार फोन आले. पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खडकवासला क्लस्टरमधील पाणीसाठा 99.88 टक्के (29.12टीएमसी) च्या तुलनेत 95.84 टक्के (27.94 टीएमसी) वर पोहोचला आहे.

इतर महत्वाची बातमी-

[ad_2]

Related posts