Asian Games 2023 Nepal Vs Mongolia Many Records Made By Nepal Cricket Team Fastest T20 International Hundred Fifty And Highest Total

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nepal vs Mongolia Cricket, Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत युवराज सिंह याचा सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडला आहे. नेपाळ आणि मंगोलिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात युवराज आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडीत निघालाय. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना अनेक विक्रमाला गवसणी घातली. २० षटकात नेपाळने ३०० धावा करण्याचा विक्रमही केला आहे.  नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंह ऐरी याने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम युवराज सिंहच्या नावावर होता. युवराजने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. पण आता नेपाळच्या दीपेंद्र याने फक्त 9 चेंडूत अर्धशतक करत नवा रेकॉर्ड केलाय. त्याशिवाय नेपाळने अनेक विक्रम केले आङेत.

दीपेंद्र याने नेपाळकडून विस्फोटक फलंदाजी केली. दहा चेंडूमध्ये 520 च्या स्ट्राइक रेटने  नाबाद 52 धावा केल्या. त्याने आपल्या डावात आठ षटकार ठोकले. त्याशिवाय नेपाळच्या कुशल मल्ला याने 50 चेंडूत 274 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 137 धावांची वादळी खेळी केली.  कुशलने आपल्या वादळी खेळीमध्ये आठ चौकार आणि 12 षटकार मारले. या शानदार खेळीसह टी२० मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम कुशलने नावावर केला आहे.  कुशलने फक्त 34 चेंडूत शथक ठोकले. याआधी टी २० मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलरच्या नावावर होता. डेविड मिलरने 35 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. नेपाळच्या संपूर्ण डावात 26 षटकारांची नोंद झाली.

टी २० मध्ये एका डावात ३०० धावा करणारा नेपाळ पहिला संघ – 

नेपाळने निर्धारित २० षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात ३१४ धावा फलकावर लावल्या.. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एका डावात ३०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम नेपाळच्या नावावर झालाय. याआधी असा पराक्रम कुणालाही करता आला नव्हता. टी२०मधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आफगाणिस्तान संघाच्या नावावर होता. अफगाणिस्तान संघाने तीन विकेटच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या. हा विक्रम नेपाळने मोडीत काढलाय.  नेपाळच्या कुशल मल्ला याने नाबाद  137 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार रोहित पौडे याने 27 चेंडूत 225.93 च्या स्ट्राइक रेटने 61 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या डावात सहा षटकार ठोकले. तर  दीपेंद्र याने आठ षटकारांसह 10 चेंडूत ५२ धावांची वादळी खेळी केली. 

 



[ad_2]

Related posts