Kidnappers Make Ransom Call After Killing Their Friend In Delhi Two Arrested Crime Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Crime News : पैशांसाठी मित्राचं अपहरण (Kidnapping) आणि नंतर खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांनी मिळून तिसर्‍याचं अपहरण करण्याचा कट रचला. त्यांनी मित्राला दारू पाजली आणि नंतर निर्जन ठिकाणी नेऊन त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना खंडणीसाठी फोन केल्याच्या घटनेनं खळबळ माजली आहे. मित्रांनीच मित्राचा खून करून खंडणी मिळवण्याचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमधून समोर आली आहे.

पैशासाठी मित्रांनीच मित्राला संपवलं

दिल्लीतील करावल नगरमधील रहिवासी 22 वर्षीय नितीनचं अपहरण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी सचिन कुमार शर्मा या 24 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार आणि दुसरा आरोपी अरुण फरार असून पोलिसांचं पथक त्याच्या शोधात आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी सचिन आणि अरुण यांनी नितीनचे अपहरण करून त्याच्या कुटुंबीयांकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपहरण करून कुटुंबियांकडून खंडणीची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गीता चौधरीने 20 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सांगितलं की, नितीन आदल्या दिवशी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास काहीही न सांगता घरातून बाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास व्हॉट्सअपवर नितीनच्या अपहरणाचा मेसेज मिळाला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, नितीनचं अपहरण करण्यात आलं असून 2 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी दिल्यानंतरच नितीनला सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं.

एक आरोपी अटक, एक फरार

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी सचिनला राजस्थानमधील गंगानगर येथून अटक करण्यात आली. यानंतर नितीनचा मृतदेह गाझियाबाद येथील जंगलात आढळून आला. आरोपी सचिनने नितीनची हत्या केलेलं ठिकाणही पोलिसांना दाखवलं जिथे आरोपी सचिन आणि अरुणने नितीनची चाकू भोसकून हत्या केली होती.

नक्की काय घडलं?

दिल्लीतील करावल नगर येथे राहणाऱ्या नितीनचे अपहरण झाले होते. दोन मित्रांनी नितीनला भेटायला बोलावले, त्यानंतर त्याला दारू पाजली. निर्जनस्थळी चाकूने वार करून त्याची हत्या केली. सचिन आणि अरुणने नितीनला निर्जनस्थळी पार्टीसाटी बोलावलं. उशीर झाल्याने नितीनने घरी परतण्याचा विषय काढला. पण, आरोपींनी त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्ये केली. हत्येनंतर आरोपींनी नितीनच्या कुटुंबाकडून खंडणीची मागणी केली. नितीन श्रीमंत असून त्याच्या अपहरणातून मिळालेले पैसे वाटून घेण्याची आरोपींची योजना होती.

[ad_2]

Related posts